Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव: स्वातंत्र्यसंग्राम सेनानी भानुदासराव जयवंतराव धुरगुडे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त मराठवाडा विभागीय स्तरीय शालेय भव्य स्पर्धा|Dharashiv: Marathwada Divisional Level School Grand Competition on 104th Birth Anniversary of Freedom Fighter Bhanudasrao Jayavantrao Dhurgude

धाराशिव:  स्वातंत्र्यसंग्राम सेनानी भानुदासराव जयवंतराव धुरगुडे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त मराठवाडा विभागीय स्तरीय शालेय भव्य स्पर्धा

धाराशिव  : स्वातंत्र्य संग्राम सेनानी भानुदासराव जयवंतराव धुरगुडे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त मराठवाडा समन्वय समिती पुणे आयोजित मराठवाडा विभाग स्तरीय शालेय विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे.

मराठवाडा समन्वय समिती पुणे ही मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी एक सामाजिक सेवाभावी संस्था आहे ही संस्था मागील अनेक वर्षापासून पुणे व मार्केट येथे विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे एक मराठवाड्यातील अग्रणी स्वातंत्र्यसंग्राम सेनानी म्हणून परिचित आहेत शासनाने ताम्रपदक व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे. त्यांनी समाज सुधारणेचे व शिक्षण प्रसाराचे बहुमोल कार्य केले. त्यांच्या 1 जानेवारी रोजीच्या जयंती दिनानिमित्त 2000 सालापासून धाराशिव जिल्ह्यात व 2014 सालापासून संपूर्ण मराठवाड्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. हे स्पर्धेचे 25 वे वर्ष आहे.

मराठवाड्याची ध्वजपताक उंच फडकावी यासाठी मराठवाड्याच्या विविध क्षेत्रातून नैपुण्याचे नवे शिलेदार घडावे या उद्देशाने मराठवाडा विभाग स्तरावर शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करीत आहोत. सामान्य ज्ञान स्पर्धा शनिवार  दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12 ते 1 दरम्यान तुळजाभवानी सैनिक विद्यालय तुळजापूर येथे मराठवाडा विभागीय वक्तृत्व स्पर्धा दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी तुळजाभवानी सैनिक विद्यालय तुळजापूर येथे  सकाळी नऊ ते सहा या वेळामध्ये व भव्य मॅरेथॉन स्पर्धा दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 ते 10 दरम्यान पंचायत समिती कार्यालय जवळ तुळजापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तसेच या दिवसाचे अवचित्य साधून मराठवाडा समन्वय समिती पुणे च्या वतीने मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांना शैक्षणिक क्षेत्रातील मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

 बक्षीस वितरण सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती कार्यालया जवळ तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

या भव्य स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पाचवा व उत्तेजनार्थ अशी  बक्षिसे दिली जाणार आहेत. 

या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग  नोंदवावा असे आवाहन स्वातंत्र्यसंग्राम सेनानी भानुदासराव जयवंतराव धुरगुडे जयंती महोत्सवाचे अध्यक्ष मा.श्री.महेंद्र भानुदासराव धुरगुडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments