Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर तालुक्यातील अणदुर येथे खंडोबा यात्रेनिमित्त रंगणार कुस्त्यांची दंगल

तुळजापुर तालुक्यातील अणदुर येथे खंडोबा यात्रेनिमित्त रंगणार कुस्त्यांची दंगल


धाराशिव  : तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथे ग्रामदैवत श्री खंडोबा यात्रेनिमित्त कुस्तीची दंगल रंगणार आहे, यासंदर्भात पूर्व नियोजनासाठी गावातील प्रमुख मान्यवर मानकरी प्रतिष्ठित नागरिक जय मल्हार तालीम संघ व ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या तीन वर्षापासून बंद झालेल्या येथील खंडोबा यात्रेनिमित्त घेण्यात येणाऱ्या कुस्त्याचा फड यंदा १४ डिसेंबर रोजी रंगणार असून यामध्ये राज्यभरातील नामवंत मल्ल सहभागी होणार आहेत. सोमवारी दिनांक 27 रोजी सायंकाळी प्रभात मंडळाच्या सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत पुन्हा कुस्तीचे मैदान चालू करून अनेक वर्षे चालू असलेली श्री खंडोबा यात्रेनिमित्तची परंपरा पुढे चालू ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. येथील जवाहर महाविद्यालयाच्या मैदानावरील लाल मातीत कुस्त्याचा फड रंगणार आहे. अनेकांनी बैठकीवेळी कुस्ती स्पर्धेतील बक्षिसाच्या रकमा जाहीर केल्या, यामुळे महाराष्ट्र केसरीच्या निमित्ताने खेळलेले अनेक मल्ल पुन्हा एकदा या अणदुरच्या  लाल मातीतील आखाड्यामध्ये दिसणार आहेत. शंभर रुपयापासून ते एक लाख रुपये पर्यंत या कुस्त्या भरवण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा ही कुस्तीची दंगल कुस्तीप्रेमीना बघायला मिळणार आहे. बालाघाट न्यूज टाइम्स तुळजापूर धाराशिव.

Post a Comment

0 Comments