तुळजापुर तालुक्यातील लोहगाव ,येडोळा शिवारात दारू अड्ड्यावर धाड नळदुर्ग पोलिसांची पोलीसांची कारवाई
धाराशिव: तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येडोळा परिसरात नळदुर्ग पोलिसांनी व राज्य उत्पादन शुल्क विभागांनी संयुक्त कारवाई करत मोठ्या प्रमाणात गावठी दारू तयार करणारे अड्डे उध्वस्त करण्यात आले . ही कारवाई शुक्रवारी दिनांक 1 रोजी करण्यात आली असून यामध्ये चार लाख 31 हजार 300 रुपये किमतीचे गावठी दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे गुळ मिश्रित रसायन व साहित्य ताब्यात घेऊन ते पंचा समक्ष नष्ट करण्यात आले याप्रकरणी नळदृग पोलीस ठाण्यात चार जनाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसाकडून मिळाली सविस्तर माहिती अशी की मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गोहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली काल शुक्रवार दि.01.12.2023 रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स्वप्नील लोखंडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, येडोळा व लोहगाव गावाचे हद्दीत गावठी हातभट्टी दारु गाळण्याच्या भट्टया सुरु आहेत. अशी माहिती मिळाल्याने सदर बातमीची हकीकत मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निलेश देशमुख यांना माहिती देवून त्यांचे आदेशाप्रमाणे पथक व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांनी सदर ठिकाणी जावून बातमीची खात्री करुन छापा मारला असता, येडोळा व लोहगाव शिवारात इसम नामे- राजु धोंडीबा राठोड, वय 33 वर्षे, 2) संजय सिध्दु राठोड, वय 40 वर्षे, 3) जालींदर रेवण पवार, वय 50 वर्षे, 4) लक्ष्मी प्रकाश आडे सर्व रा. येडोळा, ता. तुळजापूर जि. धाराशिव हे सर्वजन 4,600 लि. गावठी दारु निर्मीतीचा आंबवलेले गुळमिश्रीत रासायनिकद्रव्य हे जवळ बाळगलेले मिळून आले. तसेच गावठी दारु निर्मीतीचा आंबवलेले गुळमिश्रीत रासायनिकद्रव्य हे नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नाश करण्यात आला. सदर ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थासह मद्यनिर्मीती साहित्य व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 4,31,300 ₹ असुन वरील नमुद आरोपी यांचे विरुध्द नळदुर्ग पोलीस स्टेशन येथे गुरनं 550/2023, 551/2023, 552/2023 कलम 65(ई)(फ) महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री गोहर हसन साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी श्री निलेश देशमुख, यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री स्वप्नील लोखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तायवाडे, सुरज देवकर, पोलीस उपनिरीक्षक संजय झराड, तसेच पोलीस ठाणे नळदुर्ग पोलीस अंमलदार, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग धाराशिवचे पोलीस निरीक्षक श्री. कवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. मुंडे, पोलीस उपनिरीक्षक श्री. पवन मुळे, यांचे पथकाने केली आहे.
0 Comments