तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने भिक मांगो आंदोलन लेखी आश्वासनानंतर मागे
तुळजापुर : तुळजापूर तालुका तामलवाडी येथिल प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने भिक मांगो आंदोलन करण्यात येणार होते मात्र ग्रामपंचायत तामलवाडी यांच्या वतीने दिव्यांग निधी खर्च करण्यास तयार असून असे लेखी आश्वासन देऊन आपण पुकारलेले आंदोलन मागे घेण्यात यावे असे दिव्यांग क्रांती संघटने कडे निवेदनाद्वारे सांगितले आहे. त्यामुळे दिनांक 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिनानिमित्त पुकारण्यात आलेले आंदोलन मागे घेण्यात येत आहे असे संघटनेच्या वतीने जाहीर केले आहे. याचबरोबर दिव्यांगाना आता ग्रामपंचायत कडून पाच टक्के निधीचा लाभ मिळणार असल्याने दिव्यांगामधून आनंद व्यक्त होत आहे.
0 Comments