माळशिरस तालुक्यातील वाफेगाव येथील बंधाऱ्यास गळती नविन दरवाजे बसवा : गणेश इंगळे युवा सेना जिल्हा प्रमुख
अन्यथा पाटबंधारे खात्यास युवा सेनेच्या वतीने टाळे ठोकू
सोलापुर : शिवसेना युवा सेना सचिव वरून सरदेसाई युवा सेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम आयवळे यांच्या आदेशाने पाटबंधारे खात्याचे AC साळी साहेब यांना युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले .
महाराष्ट्रात बरेच तालुके दुष्काळग्रस्त आहेत . त्यात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस आणि माढा तालुका दुष्काळग्रस्त आहे . माळशिरस तालुक्यातील वाफेगाव येथे भीमा नदीवर सण 2009 ते 2010 ला हा बंधारा बांधण्यात आला .असून त्या बंधार्यात सन 2012 मध्ये पाणी अडविण्यास सुरुवात झाली .वाफेगाव येथील बंधाऱ्याचा संगम शेवरे बाभुळगाव माळेगाव वाफेगाव मिटकलवाडी बेंबळे या गावास शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होतो. वाफेगाव येथील बंधाऱ्यास एकूण 783 दरवाजे आहेत. या बंधाऱ्याची पाणी अडवण्याची क्षमता ही 5 मीटर उंच आहे. परंतु गेली अनेक वर्ष झाले या बंधाऱ्यात फक्त अडीच मीटरनेच पाणी अडविले जात आहे. कारण या बंदार्याचे दरवाजे कुजून खराब झाले असल्याने पाटबंधारे खात्याकडे गेली अनेक वर्ष दरवाजे उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे पाणी अडवण्याची क्षमता ही 2.5 मीटर वरती येऊन ठेपली आहे. या 2.5 मीटर पाणी अडवण्याचे क्षमतेच्या दरवाजा मधील अनेक दरवाजे हे सतत काड घाल करण्यामुळे वाकडे झाले आहेत. त्यातील काही दरवाजे हे दहा ते बारा वर्षाचे असल्याने कुजून गेले आहेत. त्यामुळे वाफेगाव येथील बंधाऱ्यास मोठ्या प्रमाणात गळती लागली असल्याकारणाने त्या बंधार्यात पाणी जास्त दिवस शिल्लक राहत नाही .शासनाच्या नियमानुसार ज्या बंधार्यास जेवढे दरवाजे असतील त्या दरवाज्याच्या 10 % टक्के दरवाजे शिल्लक ठेवावे लागतात. त्यामुळे तात्काळ वाफेगाव येथील बंधाऱ्यास 861 दरवाजे तात्काळ उपलब्ध करून द्यावेत . अशी मागणी युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी केली आहे.
यावेळी शिवसेना तालुका प्रसिद्धी प्रमुख अवधूत कुलकर्णी राहुल उर्फ लाव्हा पराडे अविनाश पराडे माऊली पराडे कविराज पराडे ई युवा सैनिक उपस्थित होते .
0 Comments