Hot Posts

6/recent/ticker-posts

शाकंभरी नवरात्र महोत्सवाचे मुख्य यजमानपदी भोपे पुजारी विनोद सोंजी यांची एकमताने निवड

शाकंभरी नवरात्र महोत्सवाचे मुख्य यजमानपदी भोपे पुजारी विनोद सोंजी यांची एकमताने निवड



तुळजापुर :-श्री तुळजा भवानी मातेचा सन २०२४ चा शाकंभरी नवरात्र महोत्सव दि.११ जानेवारी ते २६ जानेवारी २०२४ पर्यंत मोठ्या उत्साहात पार पडला जाणार आहे.या शाकंभरी नवरात्र महोत्सवात मुख्य यजमान पदाचा मान हा देविचे मुख्य १६ आणे भोपे पुजारी मंडळाला मिळालेला आहे.समर्थ लाॅज येथे समस्त भोपे पुजारी मंडळाची बैठक भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीत शाकंभरी नवरात्र महोत्सवाचा मुख्य यजमान पदी विनोद सुनिल सोंजी यांची एकमताने निवड करण्यात आली.त्यानंतर सर्व भोपे पुजारी यांनी विनोद सोंजी यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.या बैठकीत शाकंभरी नवरात्र महोत्सवात पारंपारिक वाद्याने जुन्या रूढीपरंपरेनुसारच साजरा करण्याचे ठरले.

या वेळी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम,माजी नगरसेवक संजय परमेश्वर,माजी नगराध्यक्ष अजित परमेश्वर,दिनेश परमेश्वर,सचिन कदम,समाधान कदम,जगदीश पाटील,

सुहास भैय्ये,शशीकांत कदम,चेतनमलबा,करण दादा परमेश्वर,बाबर कदम,प्रसाद मलबा,नागेश परमेश्वर,रूपेश परमेश्वर,कैलास परमेश्वर,तुषार कदम,शिवाजी कदम,क्रांती कदम,आण्णासाहेब सोंजी,गणेश परमेश्वर,सार्थक मलबा,राजाभाऊ मलबा,संदिप परमेश्वरसह अनेक भोपे पुजारी मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने हजर होते.



प्रतिनिधि रूपेश डोलारे तुळजापुर .

Post a Comment

0 Comments