/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> धाराशिव : कळंब तालुका कृषी अधिकारी सामूहिक शेततळ्यासाठी २०हजार रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

Hot Posts

धाराशिव : कळंब तालुका कृषी अधिकारी सामूहिक शेततळ्यासाठी २०हजार रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

धाराशिव : कळंब तालुका कृषी अधिकारी सामूहिक शेततळ्यासाठी २०हजार रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

धाराशिव : कळंब तालुका कृषी अधीकरी संतोष बाबुराव व्हरकट यांना सामूहिक शेततळ्यासाठी २० हजार रुपये लाच घेताना धाराशिव लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली आहे. याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, यातील तक्रारदार यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत मंजूर असलेल्या सामुहिक शेततळ्याचे अंदाजपत्रक / प्रस्ताव तयार करून तो  प्रस्ताव अपलोड करून अनुदान मंजुरीस पाठवून देण्यासाठी  यातील आरोपी  संतोष बाबुराव हुरगट , वय 50 वर्षे,  कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कळंब यांनी  पंचांसमक्ष तक्रारदार यांच्याकडे 20,000/- रुपये लाचेची मागणी करून  20,000/- रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्विकारल्याने सदर आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन कळंब , ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. 

पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक सिद्धाराम म्हेञे, सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम यांनी काम पाहिले. या सापळा पथकात पोलीस अंमलदार सचिन शेवाळे,सिध्देश्वर तावस्कर, अविनाश आचार्य, चालक दत्तात्रय करडे यांचा समावेश होता.

लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा

कार्यालय 02472 222879

टोल फ्री क्रमांक.1064

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>