हायस्कूल लोहारा शाळेत माजी शिक्षक, विद्यार्थी यांचा स्नेह संमेलन संपन्न
धाराशिव / प्रतिनिधी : हायस्कूल लोहारा शाळेतील १९९८-९९ च्या विद्यार्थ्यांचा दि.२४ डिसेंबर रोजी माजी शिक्षक विद्यार्थी यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला.२५ वर्षांनी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेतील अनुभव मिळालेले शिक्षकांचे मार्गदर्शन आपआपले मनोगतात व्यक्त केले.
"हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू" असे ब्रीद वाक्य असलेल्या हायस्कूल लोहारा ने अनेक गुणवंत विद्यार्थी घडविले आहेत.शाळेचे ऋण फेडण्यासाठी शाळेतील वाचनालयला २०० पुस्तके भेट तसेच विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य भेट स्वरूपात देण्यात आले.यावेळी १९९८-९९ बॅच च्या वतीने शिक्षकाना शाल श्रीफळ मानपत्र वतीने देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यां आणि शिक्षकांनी आपापले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी एक आठवडा आधी जो विद्यार्थी उपस्थित राहणार होता पद्माकर रसाळ यांचे आकस्मित निधन झाल्याने त्याच्या परिवारातील मुलगा व मुलगी यांनी या ठिकाणी उपस्थिती लावून वर्गमित्रांना ज्ञानेश्वरी चे पुस्तके भेट दिली.
सर्व प्रथम स्वागत गीता सह सरस्वती पुजन करून दीप प्रजवलन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी एम पोतदार तर प्रमुख पाहुणे म्हणून
टि.के मक्तेदार,चंद्रकांत पाटील, बेडगे शाम पोतदार,आर के पोतदार,वसंत राठोड,रामराव खुणे,बेडगे,दगडू जाधव,रामराव खुणे,डी एम पोतदार, करण सिह बायस,प्रभाकर पवार, बिराजदार,शंकर जगताप,पांचाळ, यांच्यासह शिक्षक वर्ग यांची प्रमुख उपस्थिती होती.
१५० किमी चा सायकल प्रवास करीत कार्यक्रम उपस्थित
स्नेह संमेलनासाठी १९९८-९९ बॅच मधील अशोक गुंडू वचने-पाटील परळी वैजिनाथ ते लोहारा १५० किमी चे अंतर पार करीत एक सामाजिक संदेश दिला.स्वता साठी ,शरीरासाठी थोडा वेळ द्या आरोग्य तसेच छंद जोपासणे हा यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
0 Comments