सहलीला निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात, एक शिक्षक जागीच ठार
सोलापुर 21 : जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात सहलीला निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात झाला. या अपघातात एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. तर एक शिक्षक जखमी झाला आहे. या अपघातात काही विद्यार्थी हे किरकोळ जखमी झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वटपळी येथे इंदापूर तालुक्यातील बावडा श्री शिवाजी विद्यालय शैक्षणिक सहल निघाली होती. एस टी क्रमांक एम एच 14 बी टी 4701 ही बस सहल घेऊन गेली होती. हा अपघात गुरुवारी पहाटे सहाच्या दरम्यान घडला. भरधाव बसने थांबलेल्या टेम्पोला धडक दिली. या अपघातात एक शिक्षक जागीच ठार झाला. एक शिक्षक जखमी झाला आहे. या अपघातात विद्यार्थी हे किरकोळ जखमी झाले आहेत. बाळकृष्ण काळे असं मृत शिक्षकाचं नाव आहे. त्यांचा या अपघातात जागेवरच मृत्यू झाला. तर रमाकांत शिवदास शिरसाठ हे जखमी झाले आहे. 108 अकलूज 0742 या अॅम्बुलन्सने अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
0 Comments