तुळजापुर तालुक्यातील काटी सरपंच व वडगाव (काटी) सरपंच यांच्यावतीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड .धीरज पाटील यांचा सत्कार
तुळजापुर : तालुक्यातील काटीसह वडगाव (काटी) येथील ग्रामपंचायतचे सरपंच तथा धाराशिव जिल्हा सरपंच परिषदेचे अध्यक्ष सुजित हंगरगेकर, वडगाव (काटी) चे सरपंच गौरीशंकर कोडगिरे,उपसरपंच प्रकाश डावरे यांच्या वतीने जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड.धिरज पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार केला. यावेळी वडगाव काटीचे सरपंच गौरीशंकर कोडगिरे, काटीचे सरपंच सुजित हंगरगेकर, वडगावचे उपसरपंच प्रकाश डावरे, प्रशांत भारती, तानवडे, भराटे, श्रीशैल्य शेंडगे, अमोल सावळे, शिवाजी साखरे आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments