Hot Posts

6/recent/ticker-posts

बक्षीस पात्र जमिनीची सातबारा नोंदीसाठी दोन हजाराची लाच घेताना तलाठी लाच लुचपतच्या जाळ्यात

बक्षीस पात्र जमिनीची सातबारा नोंदीसाठी दोन हजाराची लाच घेताना तलाठी लाच लुचपतच्या जाळ्यात


सांगली: बक्षीस पात्र जमिनीची सातबारा सदरी नोंद घेण्यासाठी दोन हजाराच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारल्या प्रकरणी आटपाडी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथील तलाठी सुधाकर कृष्णा कुंभार वय 50, राहणार कुंभार मळा उंटवाडी रोड मेंढेगिरी तालुका जत आणि त्यांचा साथीदार बाळासो बापूराव पाटील वय 42 राहणार पाटील मळा पांढरेवाडी रस्ता आटपाडी. या दोघांना लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगीहात पकडले आहे.

या घटनेची अधिक माहिती अशी की तक्रारदार यांच्या वडिलांनी त्यांच्या आईच्या नावे असलेली आटपाडी तालुक्यातील बोंबेवाडी येथील जमीन बक्षीस पत्र करून दिली होती. त्यांची सातबारा सगळी नोंद करण्यासाठी तक्रारदार यांनी तलाठी सुधाकर कुंभार यांच्याशी संपर्क साधला, मात्र तलाठी कुंभार यांनी नोंदीसाठी दोन हजाराची मागणी केली. या संदर्भात तक्रारदार यांनी दिनांक 29 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

तक्रारीची शहानिशा करून पथकाने आटपाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात सापळा लावला. त्यावेळी तलाठी सुधाकर कुंभार यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन हजाराची लाचीची मागणी करून ती रक्कम त्यांचा साथीदार बाळासो पाटील यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानंतर तलाठी सुधाकर कुंभार यांनी ती लाच स्वीकारली. यावेळी लाच लचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगीहात पकडले. यासंबंधी दोघांवर आटपाडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस उपाधीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे, पोलीस कर्मचारी अजित पाटील, सलीम मकानदार,पोपट पाटील आदींचा समावेश होता.

Post a Comment

0 Comments