नववर्ष प्रथम दिनी कर्जमुक्ती अर्ज अभियानास देवीदारातुन आरंभ
तुळजापुर - स्वाभीमानीशेतकरीसंघटना वतीने नववर्षाचा प्रथम दिनी सोमवार दि१रोजी श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेवुन मंदीरात कर्जमुक्तीचे पाच अर्ज भरुन राजेशहाजीध्दार ध्दारी देवीची महाआरती करुन स्वाभीमानी शेतकरी संघटना कर्जमुक्त सातबारा ,कर्जमाफी अभियानाचा आरंभ करण्यात आला. यावेळी ऐकच नारा सातबारा कोरा असा नारा देत मंदीर परिसर दणाणुन सोडला होता यावेळी तुळजाभवानी माता सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती ची बुध्दी दे असृ देवीचरणी साकडं घालून महाराष्ट्रात आमचे नेते माजी खा राजू शेट्टी नेतृत्वातमा. पंतप्रधान व मा. मुख्यमंत्री यांना दोन लाख शेतकऱ्यांचे कर्जमाफी अर्ज जमा करून दिले जाणार आहे. असे यावेळी या वेळी स्वाभीमानी शेतकरी संघटना युवा प्रदेशाध्यक्ष दामू अण्णा इंगोले यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले यावेळी परभणी जिल्हाअध्यक्ष किशोर ढगे धाराशिव जिल्हाअध्यक्ष रविंद्रइंगळे स्वराज्य संघटनेचे जीवन राजे इंगळे जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे तालुकाध्यक्ष दुर्वास भोजणे नेताजीजमदाडे अभिजीत सांळुके धनंजय जाधव राजेंद्र हाके सह स्वाभीमानी शेतकरी संघटना पदाधिकारी शेतकरी उपस्थितीत राहणार आहे.
0 Comments