राजस्थान, मध्यप्रदेश,छत्तीसगड भाजपचा महाविजय तुळजापुरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने जल्लोष
तुळजापुर : पाच राज्यांपैकी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर झाले. या निवडणूक निकालातून तीन राज्य भाजपने पटकवली. चार राज्यांपैकी 2018 मध्ये एकही राज्य भाजपकडे नव्हते. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार होते. परंतु मध्य प्रदेशात ऑपरेशन लोटस राबवून भाजप सत्तेवर आले. 2023 मध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. यामुळे तुळजापूर भारतीय जनता पार्टी च्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित प्रदेश कार्यकारणी सदस्य गुलचंद (भाऊ)व्यवहारे ,शहराध्यक्ष शांताराम पेंदे ,तालुका सरचिटणीस शिवाजी बोधले ,युवा तालुका अध्यक्ष आनंद कंदले ,युवा शहराध्यक्ष राजेश्वर गुड्डू कदम ,विकास मलबा ,इंद्रजित साळुंके ,लक्ष्मणजी उळेकर,सागर पारडे ,निलेश रोचकरी ,बाबा श्रीनामे ,धैरशील दरेकर ,सरपंच हणमंत पाटील ,राम चोपदार ,विलास पारडे ,बाबा घोंगते आधी सह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments