Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव जिल्ह्यातील या गावात १२ लाखाचा गांजा पकडला, घरात दडवुन ठेवला होता ८५ किलो गांजा ,परंडा पोलीस ठाण्याची धडाकेबाज कारवाई|Ganja worth 12 lakhs was caught in this village of Dharashiv district, 85 kg of ganja was hidden in the house, a daring operation by Paranda police station.

धाराशिव जिल्ह्यातील या गावात १२ लाखाचा गांजा पकडला, घरात दडवुन ठेवला होता ८५ किलो गांजा ,परंडा पोलीस ठाण्याची  धडाकेबाज कारवाई



धाराशिव  : भूम तालुक्यातील ईडा येथील एका घरात धाड टाकून पोलिसांनी 12 लाख 80 हजार 490 रुपयाचा गांजा पकडला. परंडा पोलीस ठाण्याच्या पथकाने रविवारी दिनांक 24 रोजी ही धडाकेबाज कारवाई केली. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात पाच जणाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळाली सविस्तर माहिती अशी की परंडा पोलीस ठाणे पोलीसांना दिनांक २४ रोजी मौजे ईडा ता. भूम, जि, धाराशिव येथे संतोष संजय जाधव या व्यक्तिने फार मोठ्या प्रमाणात गांजाची साठवणूक केलेली आहे अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली. गोपनीय माहितीबाबत वरीष्ठांना कळवून मौजे इडा येथे सदरील व्यक्तीच्या घरी शहानिशा करण्याच्या उद्देशाने गेले असता सदरील घर बंद असून दरवाज्याला कुलूप लावलेले आढळून आले. सदरील घर हे नमूद आरोपी संतोष संजय जाधव यांचेच असल्याबाबत पोलीस पाटील यांना विचारून खात्री केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महसूल विभागाचे प्रतिनिधी, वजन मापे निरीक्षक, दोन शासकीय पंच यांना सोबत घेऊन सदरील घरावरती घर मालकाच्या नातेवाईकांचे समक्ष छापा टाकण्यात आला. सदरील छाप्याच्या दरम्यान घरामध्ये १२,८०,४९० इतक्या रकमेचा एकूण 85 किलो 366 ग्रॅम एवढ्या वजनाचा गांजा या वनस्पतीचे पान, बोंडआणि बिया यांचा समावेश असलेले गुंगीकारक नशेसाठी वापरल्या जाणारा गांजा आढळून आला. घराची सखोल तपासणी करून सदरील गांजा शासकीय पंचांच्या समक्ष जप्त करण्यात आला. इडा हे गाव पोलीस स्टेशन परंडा अंतर्गत येते तथापि पोलीस स्टेशन परंडापासून इडा हे गाव अंदाजे 25 किलोमीटर लांबीवर असून अत्यंत दुर्गम भागात वसलेले आहे याचाच फायदा घेऊन आरोपी संतोष संजय जाधव यांनी गांजा विक्रीचा व्यवसाय करून त्यातून पैसा कमवित होता आणि तरुण पिढीला नशेच्या खाईत ढकलित होता. परंतु परंडा पोलिसांनी आपल्या गोपनीय यंत्रणेला सक्रिय करून त्याच्याबाबत माहिती मिळवली आणि त्याच्यावर कारवाई करण्यामध्ये यशस्वी झाले.

 सदरील प्रकरणात पोलीस स्टेशन परंडा येथे 285/2023 कलम 8 (क), 20 (ब)ii (क), कलम 29 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे अधिनियम 1985 अंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार करीत आहेत. सदरील गुन्ह्यामध्ये घरातील राहणाऱ्या सर्व पाचही लोकांना आरोपी करण्यात आलेले असून आरोपींचे नाव संजय रामदास जाधव, बायडाबाई संजय जाधव, सूजराबाई रामदास जाधव, संतोष संजय जाधव आणि पूजा संतोष जाधव असे आहेत.

सदरील कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी आणि माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गौरीप्रसाद हिरेमठ, पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता मुसळे, पोलीस हवालदार दिलीप पवार, पोलीस नाईक काकडे, पोलीस नाईक गुंडाळे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश यादव, पोलीस कॉन्स्टेबल कोळेकर, पोलीस कॉन्स्टेबल अडसूळ, चालक सचिन लेकुरवाळे आणि सरगर यांनी पूर्ण केली.

Post a Comment

0 Comments