विभागीयस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत निशा चव्हाणने पटकावला प्रथम क्रमांक
धाराशिव : लातूर येथील क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या विभागीय स्तरीय तायकांदो स्पर्धेत शिंगोली आश्रम शाळेचे देदीप्यमान यश विद्यार्थिनी निशा बाळासाहेब चव्हाण हिने प्रथम क्रमांक मिळून शाळेचे नाव उज्वल केले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झालेली आहे.
निशा चव्हाण ने मिळविलेल्या यशानंतर तिचा शाळेचे मुख्याध्यापक अण्णासाहेब चव्हाण, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिंदे कुमंत, पर्यवेक्षक शेख अब्बास अली, क्रीडा शिक्षक सुधीर कांबळे यांनी तिचा फुलाचा बुके देऊन येतोच सत्कार केला. याप्रसंगी सूर्यकांत बर्दापुरे, जाधव चंद्रकांत, पाटील रत्नाकर, खंडू पडवळ, दीपक खबोले, चित्तरंजन राठोड, प्रशांत राठोड, विलास राठोड, कैलास शनिमे, मल्लिनाथ कोणदे, सतीश कुंभार, सचिन राठोड, मदन कुमार अमदापुरे , श्रीमती सुनीता व्यवहारे मॅडम, श्रद्धा सूर्यवंशी मॅडम, सुरेखा कांबळे मॅडम, ज्योती राठोड मॅडम व कर्मचारी गोविंद बनसोडे, सचिन माळी, वसंत भिसे, रेवा चव्हाण, अविनाश घोडके, मस्के मामा, आडेलिंगा मामा, व याप्रसंगी शाळेचे सर्व विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या यशाबद्दल शिंगोली गावात विद्यार्थिनीचे कौतुक होत आहे.
0 Comments