तुळजापुर तालुक्यामध्ये वेळ अमावस्या सण उत्साहात साजरा
धाराशिव : शेतातील उत्पन्नाची समृद्धी व भरभराटी होण्याची मनोकामना व्यक्त करत गुरुवारी दिनांक 11 रोजी काळ्याआईची मनोभावे विधीवत पुजा करून असंख्य शेतकरी कुटुंबांनी वेळा अमावस्या उत्साहात साजरी केली. दरम्यान यंदा रब्बीच्या पेरण्याला थोडा उशीरा झालेला असला तरी पाण्याच्या कमतरतेमुळे काही शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणीच केलीच नाही त्यामुळे सिंचनाची सोय असलेल्या पिकांचा बहार वाढला आहे तर सोय नसलेल्या शेतकऱ्यांना ओसाड रानावरच वेळ अमवस्या सण साजरा करावा लागला. सकाळी दहा वाजल्यापासून शेतकऱ्यांनी नातेवाईक मित्रपरिवारासह वन भोजनाचा आनंद घेतला.
शेतकरी कुटुंबासाठी वेळा अमावस्याचा सण म्हणजे आनंद, उत्साहाची पर्वणीच असते. यंदा सुरुवातीपासूनच तालुक्यामध्ये पावसाचे अत्यल्प प्रमाण आहे त्यामुळे परिणामी रब्बीची पेरणी शेतकऱ्यांनी पावसाच्या भरोशावर उशीरा केली. सध्या कांही शिवारात ओलीताखालील पिके बहरात आलेे असले तरी पिकांवरील किड, अळीचे विघ्न दुर करण्याचा खटापोट शेतकऱ्यांना करावा लागतोय. वेळा अमावस्या असल्याने शहरात अघोषित संचारबंदी असते. शेत- शिवारात मौजमजा करण्याला जणू संधीच मिळाली.
अमावस्याच्या पुजेसाठी व विविध खाद्यपदार्थाच्या तयारीसाठी शेतकरी कुटुंबात बुधवारपासूनच तयारी सुरू होती. गुरुवारी सकाळपासुन ज्वारीचे पीठ, दह्यापासुन तयार केलेल्या अंबिलाचे मडके घेऊन शेतकरी शेत शिवारात जात असल्याने चित्र दिसत होते. आता दळणवळणाची साधने वाढल्याने बऱ्याच शेतकरी कुटुंबातील व्यक्ती मडक्याचा प्रवास वहानातुन सुरू असल्याचे चित्र दिसून आले. बालाघाट न्यूज टाइम्स साठी राजगुरू साखरे तुळजापुर धाराशिव
व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://youtu.be/5oD0sBWVywo?feature=shared
.jpg)

0 Comments