तुळजापुर तालुक्यातील सांगवी मार्डी येथे आयोध्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळळा मोठ्या उत्साहात साजरा
धाराशिव/ प्रतिनिधी : अयोध्या येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठान सोहळा निमित्ततुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथे दि,२२ रोजी ग्रामस्थांच्या वतीने रामफेरी काढण्यात आली,या रामफेरी मध्ये गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी स्त्री-पुरुष लहान मुलं-मुली हे रामफेरीमध्ये सहभागी झाले होते, ही रामफेरी आज सकाळी ९ वाजता हनुमान मंदिर पासून ते संपूर्ण गावात रामफेरी काढण्यात आली,रामफेरी नंतर हनुमान मंदिरात भजन करण्यात आले,गावचे सरपंच युवराज आप्पा बागल,संजय भाऊ तोष्णीवाल,बालाजी बागल,यांच्या हस्ते,गावचे उपसरपंच सतीश बागल,शिवाजी शिंदे,व विवेक बागल,यांचा सत्कार करण्यात आला, त्यानंतर श्रीरामाची आरती करण्यात आली,व दुपारी एक वाजता महाप्रसाद वाटप करण्यात आले,यावेळी सांगवी मार्डी ग्रामस्थ यांनी अथक परीश्रम घेतले होते. या भक्तिमय वातावरणात संपुर्ण सांगवी मार्डी नगरी दुमदुमून निघाली होती.यावेळी आयोजक गणेश (मेजर) बागल,बाळासाहेब बागल,विवेक बागल,यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे सांगवी मार्डी.
0 Comments