देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे सोलापूरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण याचा मोठा आनंद : ॲड.कोमलताई साळुंखे - ढोबळे
सोलापूर : देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे लोकार्पण सोलापूरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाले. सोलापुरातील रे नगर येथे ३६५ एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी सुमारे 30 हजार पैकी 15 हजार तयार घरांचे वाटप आज केले. पंतप्रधान आवास योजना (शहरी) अंतर्गत ही घरे बांधण्यात आली आहेत. असंघटित श्रमिक कामगारांना पाच लाखांत हक्काचे घर, या योजनेअंतर्गत मिळाले. मोदी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थ्यांना घराचे वितरण करत चावी वाटपाचे नियोजन आज करण्यात आले होते.
गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हाडाच्या माध्यमातून उभारलेल्या या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटनही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या ड्रीम प्रोजेक्टचे लोकार्पण सोहळा आज झाला.
३५० एकर परिसर, ८३४ इमारती , ३० हजार फ्लॅट्स ही देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 9 जानेवारी 2019 रोजी यांनी या प्रकल्पाचे शिलान्यास केले होते. जवळपास पाच वर्षानी पुन्हा नरेंद्र मोदी आपला शब्द पूर्ण करण्यासाठी सोलापुरात आले, यापेक्षा मोठे समाधान कोणते, असे ही ॲड. कोमलताई यांनी म्हंटले आहे.
आयुष्यभर झोपडपट्टीत जगणाऱ्या कामगारांना देखील स्वतःच हक्काच घर असावं. याच उद्दिष्टाने पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ही घरे साकारली आहेत, ही कामे आता पूर्ण झाली असल्याने लाभार्थ्यांना याचा लाभ झाला, याचा आनंद वाटतो, असेही ॲड. कोमलताई यांनी म्हंटले आहे.
0 Comments