Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रजासत्ताक दिनी हेमा घुगरदरे व महेश चोरमले यांचा प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. इनामदार यांच्या हस्ते सन्मान

प्रजासत्ताक दिनी हेमा घुगरदरे व महेश चोरमले यांचा प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. इनामदार यांच्या हस्ते सन्मान


नातेपुते प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यातील उंबरे दहिगाव  येथे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा केल्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अकलूज येथील आश्विनी रुग्णालयाचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एम के इनामदार यांच्या हस्ते उंबरे दहिगाव येथील हेमा भगवान घुगरदरे यांनी त्यांच्या बीड येथील बहिणीच्या मुलीला किडनी दान केल्याबद्दल  आणि महेश चोरमले यांना जीवन सुरक्षा राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष सोपान काका नारनावर, विष्णुपंत नारनवर, सरपंच सौ ठोंबरे,  ग्रामविकास अधिकारी सौ कर्चे, सर्व सदस्य शंभू महाविद्यालयाचे व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ व उंबरे दहिगाव येथील  ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक कांबळे यांनी केले.

Post a Comment

0 Comments