Hot Posts

6/recent/ticker-posts

उन्हाळी हंगाम व दृष्काळ चारा टंचाई व उपाय म्हणून अझोला पशुखादय हंगामी चारा म्हणून उपयोग करावा : सतीश कचरे मंडळ कृषि अधिकारी नातेपुते

 उन्हाळी हंगाम व दृष्काळ चारा टंचाई व उपाय म्हणून अझोला पशुखादय हंगामी चारा म्हणून उपयोग करावा : सतीश कचरे मंडळ कृषि अधिकारी नातेपुते       


नातेपूते प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात सरासरी पेक्षा ५० % कमी पाऊस पडल्यामुळे अति दृष्काळ ग्रस्त म्हणून घोषीत  केला . वाढलेले दूधाचे भाव ' दूध प्रक्रिया उदयोग   यामुळे दूधाला मागणी वाढली आहे . त्या मुळे जनावरे संख्या वाढली आहे व वाढत आहे . दृष्काळ परिस्थितीत पशुधन टिकवीणे महत्वाचे आहे त्यासाठी चारा म्हणून हा प्रयोग नक्कीच फायदेशीर ठरेल  अझोला हे जलशैवाल आहे व ते उत्कृष्ट पोल्ट्री शेळ्या मेंढ्या डुकरे ' गाय म्हैस यांचे पशुखादय आहे . यामध्ये शुष्क वजनाच्या २५ ते ३५ % प्रथिने ' ७ ते १० % आवश्यक अमिनो अॅसीड ' जीवनसत्व  अ . 'ब -१२ व बिटाकेरोटीन चे प्रमाण असते . अझोला कॅल्शिअम फॉस्फरस पोटॅशिअम तांबे, लोह ' मॅग्नेशिअम ही खनिजे वजनाच्या     १० -१५ % असतात . अझोला संतुलीत पौष्टीक पशु खादय आहे. आझोला सुलभतेने पचणारे खादय आहे ते पूर्णतः अझोला किंवा इतर घन व आंबवणे आहारात मिसळून देता येतो. उन्हाळी हंगामात उपलब्ध पाणी ' न्हाणीघर  पाणी ' गोट्यातील सांडपाणी ' कपडे धुतलेले पाणी याचा वापर करूनही उत्पादन घेता येते .                         

आझोला उत्पादन पद्धत - जमिन स्वच्छ करून दररोज सरासरी  ५०० ग्रॅम ते १किलो प्रति जनावर याप्रमाणे जनावरे संख्या याना पुरवठा करता येईल या प्रमाणे वीटाची आयताकृती टाकी बनविली जाते . टाकीत  २मी x  २ मी मापाची युव्ही स्टॅबिलायझर सीट प्लॅस्टीक पेपर ने पाण्याची टाकी तयार करून त्यामध्ये १०-१५ किलो बारीक माती समान टाकली जाते व पाण्याची पातळी १0 से.मी केली जाते आणि त्यामध्ये शुद्ध १ किलो अझोला मदर कल्चर सोडून एकसारखे पसरून पाणी शिपडले जाते. तदनंतर ५ दिवसांनी २० ग्रॅम सुपर फॉस्फेट + १किलो शेणखत पाण्यात मिसळवून दिले जाते . आठवड्यातून एकदा १० ग्रॅम मायक्रोन्युट्रीन्ट मिश्रण दिले जाते . प्रत्येक ३० दिवसानी टाकीतील ५ किलो माती बदलावी तसेच प्रत्येक १० दिवसांनी ३० ते ३५ % पाणी बदलावे . चांगली प्रफुल्ल वाढीसाठी फक्त ५०% सुर्यप्रकाशाची गरज असते म्हणून ५०% ची शेटनेट वापरून सावलीचे शेडनेट हाऊस तयार करावे . अशा पद्धतीने अझोला तयार केल्यानंतर प्रत्येक १५ दिवसांनी हिरवा गालीचा तयार होतो . कापणी - प्रत्येक १५ दिवसांनी दररोज पूर्ण वाढ झालेला ५०० ते ६०० ग्रॅम अझोला चाळणीचे / झारीचे साह्याने काढणी केली जाती व शेण मुत्र मशाळ वास जाणेसाठी स्वच्छ पाण्यानी धूवून पशुखादय म्हणून वापरला जातो अझोला धुतलेले पाणी परत वापरावे .  

अझोला खाद्यांचे फायदे - अझोला पशुखादय म्हणून दिले तर 

१ - फॅट वाढीसह दुध उत्पादनात वाढ होते 

 २ - पौष्टीक आहार असलेमुळे घन पशुखादय व आंबवणे चारा १५ -२० % कमी करून खर्च बचत होते 

३ - पशु पक्षी यांचे गुणवत्ता वाढ ' रोगप्रतिकारक शक्ती ' वाढ .आरोग्य सुधारते व आयुष्य वाढती

 ४ - अझोला खड्ड्यातील बदललेली माती व पाणी यांचे मुल्य १ किलो रासयनिक खता एवढे असलेमुळे माती व पाणी इतर पिकांना देता येते. 

५ - पोल्ट्री पक्षी अंड्याची संख्या आकारमान वाढते व कवच टणक होते व बॉयलरची चिकन पोष्टीकतेमध्ये वाढ होते . 

अझोला देण्याची पद्धत - 

प्रथमता : पशु पक्षी यांना सवई होणेसाठी १:१ प्रमाणात घन  व आंबवणे पशुखादय बरोबर देण्यात येते  सुकवलेला अझोला १०% प्रमाणात पशुखादयातून मिसळून देण्यात येतो मोठी जनावरे दुभती गाई, म्हैस शेळी मेंढी डूकरे पोल्टी पक्षी यांना सवई झाली की प्रति दिन वजनाच्या १०% साधारणपणे१ ते १.५ किलो पर्यत खाऊ घालावा . लावडीस सोपे उपलब्ध पाणी व सांडपाणी वापर अल्पखर्चिक पौष्टीक पशुआहार अझोला उत्पादन करून गाय म्हैस शेळी मेंढी डुकरे बॉयलर लेअर पोल्ट्री यांच्या आहारात वापरून उन्हाळी हंगामधील चारा टंचाईवर एक चांगला किफायतशीर उपाय आहे म्हणून यांचा अवलंब शेतकरी बांधवांनी करावी असे आव्हान (ISO9001:2015) नातेपुते कृषी मंडळ अधिकारी सतीश कचरे  यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments