Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथे अक्षता कलशाचे उत्साहात स्वागत

तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथे अक्षता कलशाचे उत्साहात स्वागत


चिवरी: अयोध्येतील निर्मानाधीन भव्य मंदिरात श्री प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची दि,२२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्याचे निमंत्रण घरोघरी पोहोचवण्यासाठी आयोध्या येथून अक्षता पाठवण्यात आल्या आहेत. या अक्षता तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे दि,१३  रोजी पोहचल्यानंतर गावातून अक्षता कलशाची भव्य मिरवणूक काढून फटाक्यांची आताषबाजी करत उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी टाळ मृदंगाच्या गजरात प्रभू रामचंद्राच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. या शोभा यात्रेचे हनुमान मंदिरातून प्रारंभ करण्यात आला. यावेळी येथील धनगर बांधवांच्या ढोल-झांजाने सर्वांचे लक्ष वेधले होते. तर गावातील महिलांनी आपापल्या घरासमोर सडा रांगोळी करून प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे मनोभावे पूजन करत दर्शन घेतले. ही भव्य शोभा यात्रा यशस्वी पणे पार पाडण्यासाठी गावातील सर्व समाज बांधवांनी परिश्रम घेतले .

Post a Comment

0 Comments