धाराशिव : बंजारा समाजाचे क्रांतीसूर्य,थोर समाजसुधारक काशिनाथ बापू यांची 60 वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी
धाराशिव : गोर शिकवाडीचे जनक संस्थापक अध्यक्ष क्रांतीसुर्य काशिनाथ नायक यांची 60 वी जयंती शिंगोली तांडा व आश्रम शाळा शिंगोली येथे पार पडली यामध्ये प्रमुख उपस्थीती,सुरेश भाऊ पवार ऊसतोड कामगार संघटना प्रदेश अध्यक्ष,जाधव सर इजिनिअरिंग काॅलेज धाराशिव, अॅड. जाधव मॅडम धाराशिव जिल्हा कोर्ट,सचिन राठोड ,मोहन राठोड .गोर सेना जिल्हा सचिव कालिदास चव्हाण, गोर सेना तालुका अध्यक्ष.दिलीप आडे .गोर सेना जिल्हा संघटक ,शाहाजी चव्हाण तालूका सचिव राजूदास राठोड,गोर शिकवाडी सोबती प्रथ्वीराज चव्हाण,तालूका सोबती आकाश आडे, गोर सेना शाखा प्रमुख शिंगोली तांडा संजय भाऊ राठोड,गोर सोबती,विशाल चव्हाण गोर सेना सोबती व समस्त शिंगोली ग्रामस्थ तांडा ,माध्यमिक, प्राथमिक आश्रम शाळा शिंगोलीचे सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी शाळेतील विध्यार्थी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी क्रांतीसूर्य,समाजसुधारक काशिनाथ नायक यांनी केलेल्या कार्याबदल, बंजारा समाजाच्या विकासात त्यांनी केलेल्या समाज परिवर्तना बाबत.
बंजारा समाज सुधारक काशिनाथ बापू यांचे आदर्श घेऊन महाराष्ट्रातील वंचित ऊसतोड कामगारांच्या हिताचे, त्यांच्या पाल्याच्या शिक्षणाबाबत वसतिगृहाची सोय, कल्याणकारी योजना, इतर सुविधा, अपघाती मरण पावलेल्या महाराष्ट्रातील इतर जिल्यातील मयत ऊसतोड कामगारांच्या वारसाना प्रत्येकी 5 लाखाची आर्थिक मदत, धाराशिव जिल्ह्यात असलेल्या साखर कारखाना स्तरावर ऊसतोड कामगारांना रेशनचे धान्य योजना सफल करण्यासाठी आणि भविष्यात ऊसतोड कामगारांना शासनाच्या कल्याणकारी योजने खाली आणण्यासाठी कार्य चालू असलेबाबत, ऊसतोड करणाऱ्या कामगारांना सुरक्षितता म्हणून पायातील घनबूट, टेन्ट मिळवून देणार असलेबाबत आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच यावेळी दिलीप आडे साहेब, प्रा. जाधव सर व इतर मान्यवरांनेही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरेश पवार यांच्या मार्फत विध्यार्थ्यांना फळाचे,प्रा. श्री. उत्तम चव्हाण सर यांच्या वतीने खाऊ, ऍड. अश्विनी जाधव यांच्या वतीने विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
जयंतीच्या कार्यक्रमाचे नियोजन गोर सेना, गोर शिकवाडी, जिल्हा, तालुका पदाधिकारी, सचिन राठोड यांच्या नियोजनाने पार पाडण्यात आहे.
0 Comments