धाराशिव: जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांची जिल्हा नियोजन समिती धाराशिव च्या विशेष निमंत्रित सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल मा.पत्रकार यांच्यावतीने जाहीर सत्कार
धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष मा. श्री. महेंद्र काका धुरगुडे यांची जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल भाजपा लोहारा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा पत्रकार संघ तालुकाध्यक्ष लोहारा इकबाल मुल्ला, दै. विकासधारा संपादक मा.बाबासाहेब अंधारे, महाराष्ट्र टाइम्स जिल्हा प्रतिनिधी रहीम शेख यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे,अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस खलील पठाण, महिला जिल्हा कार्याध्यक्ष अप्सरा पठाण, अल्प संख्यांक जिल्हाध्यक्ष असद खान पठाण, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप,सोशल मीडिया विभाग जिल्हाध्यक्ष सुहासराव मेटे,सामाजिक न्याय विभाग जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ जानराव, धाराशिव तालुका सचिव सुजित बारकुल,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अरफात काझी,अल्पसंख्यांक शहर कार्याध्यक्ष समीर खतीब,आंबेजवळगा जि.प.गटप्रमुख सुरेश राठोड, केशेगाव जि.प गटप्रमुख लिंबराज लोखंडे, बाळासाहेब सूर्यवंशी पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.
0 Comments