Hot Posts

6/recent/ticker-posts

नोकरीचे आमिष दाखवून तरुणास पावणे दोन लाखाचा ऑनलाईन गंडा उमरगा येथील खळबळजनक घटना|A sensational incident in Umarga where a youth was lured with a job and received an online extortion of two lakhs

नोकरीचे आमिष दाखवून तरुणास पावणे दोन लाखाचा ऑनलाईन गंडा उमरगा येथील खळबळजनक घटना

धाराशिव: नोकरीचे आमिष दाखवून तरुणास पावणे दोन लाखाचा ऑनलाईन गंडा घातल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना उमरगा येथे घडली असून याप्रकरणी बुधवारी दिनांक 10 रोजी सायबर ठाण्यात अज्ञात महाठकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की उमरगा येथील रोहित विजयकुमार कदम ( वय 30 )राहणार उमरगा यांना अनुकळी व्यक्तीने 25 ते 26 ऑक्टोबर या कालावधीत फोन केला. तुम्हाला जॉबची ऑफर आहे असे आमीष दाखवून त्या अज्ञात व्यक्तीने टेलिग्राम ग्रुपला फिर्यादी कदम यांना जॉईन करून वेगवेगळे टास्कचे मेसेज पाठवले. टास्कच्या नावाखाली जादा रिटर्न ची लालूच दाखवून त्यांनी फिर्यादी कदम यांना पैसे भरण्यास सांगितले त्यानुसार फिर्यादीने 6000 रुपये व 46 हजार रुपये भरले. फिर्यादीने ज्यादा रिटर्न मागितली असता येणारा परतावा न देता ग्रुप मधून अज्ञात व्यक्तीने फिर्यादीस काढून टाकले. फिर्यादीने कस्टमर केअरचा नंबर सर्च करून त्यावर कॉल केला असता समोरील बोलणारे अज्ञात व्यक्तीने मोबाईल वरती रस्कटेक्स ॲप घेण्यास सांगून फिर्यादीच्या मोबाईल ऍक्सेस घेतला. बँक डेबिट कार्ड ची माहिती घेऊन एचडीएफसी खात्यावरून ऑनलाईन पद्धतीने पन्नास हजार दोन वेळा व २४५९९ रुपये अशी एकूण एक लाख 76 हजार 599 रुपये ऑनलाईन काढून घेत फसवणूक केली या प्रकरणी कदम यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून अज्ञात महा ठकाविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सतर्क राहण्याची गरज

जिल्ह्यात यापूर्वी देखील ऑनलाइन फसवणुकीच्या अनेक घटना घडल्या आहेत अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर फोन करून विविध प्रकारचे आम्हीच दाखवून नागरिकांच्या बँक खात्याची माहिती घेऊन बँक खात्यावरील रक्कम परस्पर काढून घेतली आहे त्यामुळे अशा घटना वारंवार होऊ नये यासाठी नागरिकांनी सतर्क रहावे अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये असे आव्हान पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे .

Post a Comment

0 Comments