महाराष्ट्र विकास सेना पक्षाची नातेपुते येथे बैठक शहराध्यक्षपदी आवळे तर उपाध्यक्षपदी लांडगे
नातेपुते प्रतिनिधी : महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत नातेपुते येथील हिवरकर कॉम्प्लेक्स येथे पक्षाची बैठक संपन्न झाली.बैठकीत नातेपुते शहाराध्यक्षपदी नारायण आवळे,उपाध्यक्षपदी अजय लांडगे यांची निवड करण्यात आली.यावेळी पक्षाचे नेते दत्ता कर्चे,समन्वयक अजित साठे,सचिव अनिल साठे,पैलवान दत्ता रूपणवर,सचिन खिलारे,बापूराव बुधावले,नितीन मदने,राहुल खिलारे,रोहन सोनवणे,वैभव खिलारे नाना पवार,उपस्थित होते.
नातेपुते येथील बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे माजी तालुका अध्यक्ष राहुल राणे,नातेपुते येथील अक्षय डबडे,नारायण आवळे,अजय लांडगे,भैय्या लांडगे,शिंदे नगर फलटण येथील विलास सपकाळ,मारकडवाडी येथील महादेव मारकड,सचिन रणदिवे,दहिगाव येथील सुनील जगताप,भीमराव अवघडे,धीरज साळवे,किसन खिलारे,मामा अवघडे,नाना खिलारे,यांनी जाहीर पक्षप्रवेश केला.
महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गावात शाखा हा उपक्रम राबविण्यात येत आहे,नुकतीच लोकसभा निवडणुकीत उतरण्याचे संकेत पक्षप्रमुख किरण साठे यांनी दिले आहेत,त्यानुसार महाराष्ट्र विकास सेना पक्षाची वाटचाल असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.
0 Comments