Hot Posts

6/recent/ticker-posts

रामराज्याच्या दिशेने वाटचालीसाठी ३ जानेवारीला सोलापूरमध्ये हिंदु राष्ट्र-जागृती सभा - रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

रामराज्याच्या दिशेने वाटचालीसाठी ३ जानेवारीला सोलापूरमध्ये हिंदु राष्ट्र-जागृती सभा - रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती


सोलापूर - पाच जुलमी इस्लामी पातशाह्यांना धूळ चारत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते केवळ स्वराज्य नव्हे, तर ‘हिंदवी स्वराज्य’ होते. आज आपण एकीकडे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष साजरे करत आहोत, अन् दुसरीकडे अयोध्येत भव्य श्रीराममंदिरात रामलला विराजमान होत आहेत. या पवित्र भूमीने प्रभू श्रीरामाचे सर्वार्थांने आदर्श ‘रामराज्य’ पाहिले, पांडवांचे ‘धर्मराज्य’ पाहिले. चंद्रगुप्त मौर्यांचे विशाल असे ‘मौर्य शासन’ पाहिले, राजा कृष्णदेवरायाचे ‘विजयनगरचे साम्राज्य’ पाहिले, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श असे ‘हिंदवी स्वराज्य’ अनुभवले आहे. आज तीच भूमी धर्माधिष्ठित कल्याणकारी ‘हिंदु राष्ट्रा’ची वाट पहात आहे. याच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी 3 जानेवारी 2024 या दिवशी भवानी पेठ, जयभवानी प्रशालेचे मैदान येथे सायंकाळी 5.30 वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त व उद्योजक श्री. सत्यनारायण गुर्रम, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. बापू ढगे, अक्कलकोट प्रज्ञापुरी ज्ञानपीठाचे अध्यक्ष श्री. प्रसाद पंडित, सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे उपस्थित होते.   


भारताच्या संविधानात प्रस्तावनेत प्रत्येक नागरिकाला समता, बंधुता आणि न्याय मिळेल, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात आपल्या देशात अल्पसंख्य आयोग, सच्चर आयोग, वक्फ मंडळ, अल्पसंख्यांक विकास मंत्रालय आहे; मात्र बहुसंख्य हिंदूंना कोणतेही संरक्षण देणारे मंत्रालय-आयोग नाही. देशभरात केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण, तर मशिदी-चर्चचे सरकारीकरण का नाही ? अल्पसंख्याकांना धर्माच्या आधारावर शैक्षणिक अनुदान, मग बहुसंख्य हिंदूंनी काय अपराध केला आहे ? हे सर्व पहाता भारतात खरोखरच ‘सेक्युलर’ व्यवस्था अस्तित्वात आहे का ? हिंदूंच्या हजारो युवतींना उद्ध्वस्त करणारा ‘लव्ह जिहाद’, भारतीय अर्थव्यवस्थेवरील संकट ‘हलाल जिहाद’ यांसारख्या हिंदूंवर होणार्‍या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात येणार आहे, असेही श्री. शिंदे यांनी या वेळी सांगितले.  


‘‘या सभेत सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे, तसेच हिंदु विधीज्ञ परिषदेचे परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर हे मार्गदर्शन करणार आहेत. हिंदु जनजागृती समितीचे सोलापूर जिल्ह्यातही व्यापक कार्य चालू असून हिंदूसंघटन मेळावे, ‘हलाल’सक्तीच्या विरोधात जागृती यांसह राष्ट्र आणि धर्म यांवर आघात करणार्‍या विविध विषयांवर निवेदन, आंदोलन, पत्रकार परिषद, धर्मशिक्षणवर्ग या माध्यमातून जनजागृती चालू आहे. सभेच्या निमित्ताने शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये प्रसार चालू असून गेले विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. भित्तीपत्रके, हस्तपत्रके, फलकलेखन, रिक्शा, होर्डिंग, सामाजिक संकेतस्थळ, शहरातील विविध भागांतून प्रसार फेरी यांच्या माध्यमातून व्यापक स्तरावर सभेचा प्रसार झाला आहे.’’ तरी या सभेला समस्त हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे. 


आपला विश्वासू,

श्री. राजन बुणगे,

हिंदु जनजागृती समिती, सोलापूर 

(संपर्क क्रमांक : 9762721304)

Post a Comment

0 Comments