Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर नगर परिषद कर्मचारी कदम, पठाण यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

तुळजापुर नगर परिषद कर्मचारी कदम, पठाण यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

तुळजापुर:   नगरपरिषद कर्मचारी श्री.सुनिल सुभाष कदम व श्री.इफरोज पठाण हे नियत वयोमानानुसार नगरपरिषद सेवेतून सेवानिवृत्त झाले. तुळजापूर नगरपरिषद कर्मचारी संघटना यांच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ श्री.रामकृष्ण जाधवर सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव व लक्ष्मण कुंभार मुख्याधिकारी नगरपरिषद तुळजापूर यांच्या शुभहस्ते हार, पुष्प गुच्छ,फेटा तसेच आई तुळजाभवानी मातेची प्रतिमा देवून गौरविण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी त्यांना सेवानिवृत्त नंतरच्या देय रक्कमेचे धनादेशही अदा करण्यात आले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.वैभव पाठक कार्यालय अधीक्षक यांनी केले.  संघटना अध्यक्ष श्री.दत्ताजी साळूंके यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी श्री.बापू रोचकरी, श्री.अमित हेलाले, श्रीमती प्रफुल्लता बरुरकर, श्री.बालाजी जाधव, श्री.अमर ताकमोघे, श्री.नागेश काळे, श्री.दादा भाजी, श्री.जयजयराम माने इ.कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.




Post a Comment

0 Comments