Hot Posts

6/recent/ticker-posts

रत्नत्रय शैक्षणिक संकुलात ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

रत्नत्रय शैक्षणिक  संकुलात ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

सकारात्मक विचार माणसाला जीवनात यशाच्या शिखरावर नेतात प.पू. आचार्य १०८ श्री सुयशसागर महाराजजी ससंघ


नातेपुते प्रतिनिधी : मांडवे येथील रत्नत्रय शैक्षणिक संकुल येथे ७५ वा प्रजासत्ताक दिन प.पू. आचार्य १०८  श्री सुयशसागर महाराजजी ससंघ व प.पु  श्रुुतकुमुदिनी श्री १०५ सक्षममती माताजी यांचे सानिध्यात तसेच  पंढरपूरचे सुप्रसिद्ध स्त्रीरोग व प्रस्तुती तज्ञ मा. श्री डॉ.सुदेश दोशी यांच्या शुभहस्ते, अकलूजचे सुप्रसिद्ध स्त्रीरोग व प्रस्तुती तज्ञ डॉ.सतीश  दोशी,  मोहनलाल दोशी, जितेश शहा यांच्या उपस्थितीत मा. श्री अनंतलाल दोशी संस्थापक अध्यक्ष रत्नत्रय परिवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.२६ जानेवारी १९५० पासून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. देशाचे राष्ट्रपती या कार्यक्रमात सहभागी होतात आणि या दिवशी ध्वजारोहण करतात. 

 तेव्हापासून हा सण देशात साजरा केला जातो. हा तो दिवस आहे जेव्हा भारताने आपल्या देशाच्या आणि नागरिकांच्या हितासाठी संविधान (नियम) मुक्तपणे पारित केले. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे, ज्याला बनवण्यासाठी तब्बल २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांचा कालावधी लागला. यानंतर, २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद,  यांच्याकडे देशाचे संविधान सुपूर्द केले.  



कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांनी कवायत साजऱ्या करण्यात आल्या त्या नंतर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध विषयावरती मनोगते व्यक्त केली त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला. यामध्ये देशभक्तीपर गीत, प्रासंगिक गीत यांचा समावेश होता. सदर प्रसंगी बोलताना प्रमोद भैय्या दोशी यांनी शाळेची पार्श्वभूमी व भविष्यातील वाटचाल याचा आढावा घेतला त्यांनी 2025 पर्यंत एक आदर्श शैक्षणिक संकुल उभा करण्याचा  संकल्प असल्याचे बोलून दाखवले.

डॉ सतीश दोशी यांनी विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्याचे आव्हान केले. तसेच ते पुढे म्हणाले सकारात्मक विचार, व्यायाम,कुटुंब, मैनु, प्रेम, योगासन या गोष्टी गरजेच्या आहेत. जर या गोष्टी जीवनात असतील तर कोणताही आजार होणार नाही. डॉ. सुदेश दोशी म्हणाले की येणारी पिढी ही देशासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे व त्यासाठी सर्व विद्यार्थी योग्य ते योगदान देतील असा मला आत्मविश्वास आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंतलाल दादा दोशी म्हणाले "भारत या देशाची निर्मिती संघर्षातून झालेली आहे.ज्यांच्या जीवनामध्ये संघर्ष आहे त्यांचे जीवन यशस्वी होते. त्याचबरोबर  प्रत्येकाची वाणी प्रेमळ  पाहिजे.  प्रत्येकाने जीवन जगत असताना आचार विचार याचा समतोल साधला पाहिजे तरच मनोबल वाढते.


यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प.पू. आचार्य १०८ श्री सुयशसागर महाराजजी ससंघ म्हणाले की "जीवनामध्ये शाकाहार गरजेचा आहे.मनुष्याने शाकाहार केल्यामुळे देहातील तमोगुणाचा लय होतो. शाकाहार करणे म्हणजे ‘धर्मपालन करणे’ होय. महात्मा गांधींचे अहिंसा हे तत्व आज जगाला गरजेचे आहे.विचार माणसाच्या जीवनात फार महत्त्वाचे असतात. निसर्गाने माणसाला विचारशक्ती अगदी मुक्त हस्ताने बहाल केली आहे. इतर कोणत्याही प्राण्याकडे विचार करण्याची अथवा विचारांची देवाण-घेवाण करण्याची शक्ती नाही. विचारांचा माणसाच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. कारण विचार हे सतत मनात स्फुरत असतात. सकारात्मक विचार (positive thinking) माणसाला जीवनात यशाच्या शिखरावर नेतात. त्याचबरोबर  सर्वांच्या जीवनामध्ये पाच सिद्धांत असणे गरजेचे आहे. लोक काय म्हणतील,मला होणार नाही,माझी मनस्थिती नाही,माझे नशीब खराब आहे, माझ्याजवळ वेळ नाही. यामधून बाहेर पडले पाहिजे.

प्रत्येकाने जीवनामध्ये  कोणत्याही  कामामध्ये सकारात्मक विचार केला पाहिजे व मी हे करणारच हा संकल्प असला पाहिजे. हा जीवन विकासाचा विचार यांनी विद्यार्थ्यांना दिला."



यावेळी कार्यक्रमात प.पू. आचार्य १०८ श्री सुयशसागर महाराजजी ससंघ व प.पु  श्रुुतकुमुदिनी श्री १०५ सक्षममती माताजी, पंढरपूरचे मोहनलाल दोशी, सुप्रसिद्ध स्त्रीरोग व प्रस्तुती तज्ञ मा. श्री डॉ.सुदेश दोशी, अकलूजचे सुप्रसिद्ध स्त्रीरोग व प्रस्तुती तज्ञ डॉ.सतीश दोशी मा.श्री अनंतलाल दोशी, अभयकुमार दोशी ,  सुरचंद गांधी, मृणालणी दोशी, प्रफुल्ता दोशी,सदाशिवनगरचे  सरपंच,  विरकुमार दोशी, रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी स नगर सचिव प्रमोद दोशी ,संचालक  वैभव शहा, अभिजीत दोशी, बाहुबली दोशी,सुरज दोशी , निवास गांधी ,रोनक   चंकेश्र्वरा  ,अमित गांधी अजय गांधी  , बबन गोफणे, संजय दोशी,विजय गांधी  , सुरेश धाईजे , वसंत ढगे, दत्ता भोसले, ज्ञानेश् राऊत ,महादेव  सपकाळ, चंद्रकांत तोरणे, पूनम दोशी, भागश्री दोशी,  प्रियका दोशी, सपना दोशी, धनश्री दोशी, आरती मोडासे, पार्वती जाधव , सारिका राऊत,समन्वयक अमित पाटील सर मुख्याध्यापक दैवत वाघमोडे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ माधवी रणदिवे मॅडम यांनी केले. शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटत करून आणि देशभक्तीपर नारे देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments