Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर येथे बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी.

तुळजापुर येथे बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी

धाराशिव :तुळजापूर येथे शनिवार दि ६ जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह मध्ये व्हाईस मिडिया व पत्रकारांच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून अभिवादन करण्यात आले यावेळी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

व्हाईस मिडिया तुळजापूर तालुका व पत्रकारांच्या वतीने शनिवार दि ६ रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे शासकीय विश्रामगृहात सकाळी ठिक १० वा प्रतिमा पुजन व अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी लोकमत चे ज्येष्ठ पत्रकार गोविंद खुरूद,रहिम शेख ,दिनेश सलगरे यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी ज्ञानेश्वर वाघमारे,अजित चंदनशिवे,दयानंद काळुंके, सचिन ताकमोघे, चाँदसाहब शेख, बालाजी गायकवाड, सिद्दीक पटेल,रुपेश डोलारे,अमिर शेख,अहमद अन्सारी , अनिल देडे आदीसह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Post a Comment

0 Comments