तुळजापुर तालुक्यातील इटकळ येथे प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
"""""""""'"''''''"""""""""""""""'''''''''"""""""""""
रामभक्त नागनाथ स्वामी यांनी दिली पस्तीस हजार रुपयाची प्रभू रामचंद्र यांची मूर्ती
"""""""'"""""""""""""""""""""""""""""""""''"""""
रामफेरी,होमहवन, विधी युक्तपुजन महाआरती, हरी भजन व राम स्मरण आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.
"""""""'"""""""""""""""''"""""""""""''""""""""""""
धाराशिव :- तुळजापूर तालुक्यातील मौजे इटकळ येथे सोमवार दि.22 जानेवारी रोजी प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या राममय सोहळ्याचा लाभ सर्व रामभक्तांनी घ्यावा असे आवाहन रामभक्त ग्रामस्थ यांनी केले आहे.पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्या येथे श्री प्रभू रामचंद्र यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठया उत्साहात संपन्न होत आहे. आणि त्याच शुभ मुहूर्ताचे औचित्य साधत इटकळ येथील रामभक्तांच्या वतीने प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे. सकाळी श्रीराम मूर्तीची भव्य अशी मिरवणूक, होम हवन,विधियुक्त पुजन,महाआरती हरिभजन व रामजप अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ही करण्यात आलेले आहे. रामभक्त नागनाथ स्वामी यांनी प्रभू रामचंद्र यांची मूर्ती दिली तर रामभक्त अमोल पाटील यांच्या वतीने महा प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तरी गाव परिसरातील रामभक्तांनी या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व धार्मिक कार्यक्रमांचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन रामभक्त ग्रामस्थ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
0 Comments