डॉ.सचिन ओंबासे उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी उल्लेखनीय व नाविन्यपुर्ण कामगिरीच्या आधारे राज्यस्तरावरुन पारितोषिक देऊन सत्कारासाठी निवड
धाराशिव, दि.23 : जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी विविध नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून लोकाभिमुख व पारदर्शक काम करून प्रशासनात वेगळी ओळख निर्माण केली आहे
राज्यात सन 2023-24 या वर्षाच्या कालावधीत निवडणूकविषयक संदर्भात केलेल्या उल्लेखनीय व नाविन्यपुर्ण कामगिरींच्या आधारे राज्यस्तरावरुन पारितोषिक देऊन सत्कारासाठी निवड केलेल्या राज्यातील अधिका-यांची/ संस्थांची / व्यक्तींची भारत निवडणूक आयोगाच्या निदेशांनुसार 25 जानेवारी, 2024 रोजी 14 वा राष्ट्रिय मतदार दिन कार्यक्रम संपूर्ण राज्यभर साजरा करण्यात येणार आहे.यानुसार जयहिंद कॉलेज,चर्चगेट,मुंबई येथे राज्यस्तरावर राष्ट्रिय मतदार दिवस साजरा करण्यात येत आहे.या कार्यक्रमाअंतर्गत राज्यात गेल्या वर्षभरात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या आधारे वर्गवारीनुसार 14 व्या राष्ट्रिय मतदार दिन कार्यक्रमानिमित्त 24 जानेवारी 2024 रोजी जयहिंद कॉलेज,चर्चगेट,मुंबई येथे पारितोषिके देऊन सत्कार कार्यक्रम आयोजित केला आहे.
0 Comments