तुळजापुर तालुक्यातील मैलारपूर येथील श्री खंडोबा मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी
तुळजापुर तालुक्यातील मैलारपूर येथील श्री. खंडोबा मंदिरात दर रविवारी भाविकांची दर्शनासाठी मोठी मांदियाळी होत आहे, भाविक सकाळपासूनच मंदिरात रविवारी दिनांक 31 रोजी दर्शनाच्या रांगा लावल्या होत्या, येळकोट जय मल्हारच्या जय घोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता, श्री खंडोबाची एकूण आठ प्रमुख तीर्थक्षेत्र आहेत. त्यातील मैलारपूर हे दुसरे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. श्री खंडोबाची अणदूर आणि नळदुर्ग मध्ये दोन वेगवेगळी मंदिरे आहेत. मूर्ती मात्र एकच आहे, अणदूरमध्ये सव्वा दहा तर नळदुर्ग येथेे पावणेदोन महिने श्री खंडोबाची मूर्ती ठेवण्याची परंपरा आहे. नळ राजाची पत्नी दमयंती हिच्या भक्तीमुळे श्री खंडोबा नळदुर्गात प्रकट झाले तसेच दमयंती राणीच्या भक्तीमुळे श्री खंडोबाने बाणाईस चंदनपुराहुन आणून मैलारपूर नळदुर्गात विवाह केला. व नंतर जेजुरी कडे प्रस्थान केले अशी अख्यायीका आहे. अणदूरमध्ये सव्वा दहा महिने तर मैलारपूर (नळदुर्ग) मध्ये पावणे दोन महिने श्री खंडोबाची मूर्ती ठेवण्याची परंपरा हजारो वर्षापासून कायम सुरू आहे,अणदुरहुन नळदुर्गला आणि नळदुर्गहुन अणदूरला मूर्ती प्रस्थान करताना दोन्ही गावातील मानकऱ्यात करार केला जातो. देवाचा करार करण्याची प्रथा महाराष्ट्रात फक्त येथे चालते हे येथील विशेष आहे.श्री खंडोबाची मूर्ती अणदुर येथुन नळदृग (मैलारपूर )येथे प्रस्थान झाल्यावर येथील यात्रा उत्सव सुरू होतो. दर रविवारी भावीक भक्त देवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतात त्यास खेटे असे म्हटले जाते. पौष पौर्णिमा महायात्रा संपल्यानंतर अष्टमीला मूर्ती अणदुरकडे प्रस्थान केली जाते.बालाघाट न्युज टाइम्स नळदुर्ग धाराशिव.
0 Comments