धाराशिव :श्रीपतराव भोसलेमध्ये 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' अंतर्गत श्री. चव्हाण यांचे व्याख्यान
धाराशिव : येथील श्रीपतराव भोसले माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, धाराशिव यांच्याकडून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत 'मिटकॉन' जिल्हा समन्वयक श्री. व्ही. टी. चव्हाण यांचे 'स्वयंरोजगार आणि उद्योजकता' विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या स्पर्धेच्या जगात विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न धावता व्यवसायाकडे वळण्याचा सल्ला दिला. स्वयंरोजगारासाठी कोणकोणते व्यवसाय करता येतील याचे त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच स्वयंरोजगाराच्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. एस. देशमुख सर, उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे सर, उपमुख्याध्यापक श्री. एस. बी. कोळी सर, पर्यवेक्षक श्री. एन. आर. नन्नवरे सर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी विद्यालयातील शिक्षक श्री. बी. एस. नन्नवरे सर, श्री. के. बी. मोहिते सर, श्री. ए. जे. खुने सर, श्री. शिंदे एल. एस. सर, श्री. एस. आर. जाधव सर, सौ. एस. एल. जाधव मॅडम, सौ. वाडकर मॅडम, सौ. शेळके मॅडम आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष श्री. सुधीर अण्णा पाटील सर व प्रशासकीय अधिकारी श्री. आदित्य पाटील सर यांचे सहकार्य लाभले.
0 Comments