Hot Posts

6/recent/ticker-posts

इटकळ येथील मेजर रफिक मुजावर यांची सैनिक फेडरेशनच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याने ग्रामस्थ्यांच्या वतीने करण्यात आला भव्य नागरी सत्कार|Major Rafiq Mujawar from Itkal was elected as Tuljapur taluka president of Sainik Federation and a grand civil felicitation was given on behalf of the villagers

इटकळ येथील मेजर रफिक मुजावर यांची सैनिक फेडरेशनच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याने ग्रामस्थ्यांच्या वतीने करण्यात आला भव्य नागरी सत्कार

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

ब्रिगेडीयर तथा माजी खासदार सुधीर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली भव्य नगरी सत्कार मोठया उत्साहात संपन्न

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""


धाराशिव:- तुळजापूर तालुक्यातील मौजे इटकळ येथील सुपुत्र मेजर रफिक मुजावर यांची सैनिक फेडरेशन तुळजापूर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याने मुजावर परिवार व ग्रामस्थ्यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा शुक्रवार दि.19 जानेवारी रोजी मोठया उत्साहात व थाटामाटात संपन्न झाला. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रिगेडीयर तथा माजी खासदार सुधीर सावंत हे होते तर भाजपाचे धाराशिव जिल्हा सचिव ऍड. दिपक आलुरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे, सैनिक फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी निंबाळकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जावळे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव वडगावे, मुकुंद दादा डोंगरे, गोकुळ शिंदे, विजय सरडे, मलंग शेख, अतुल जगताप दयानंद मुडके, यांची प्रमुख उपस्थिती होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पुजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सन्मान मुजावर परिवार व मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आला.विनायक जाधव यांनी प्रास्ताविक करताना मेजर रफिक मुजावर यांच्या सामाजिक कार्य प्रणाली विषयी माहिती दिली.त्यानंतर सैनिक फेडरेशनचे नुतन तालुका अध्यक्ष मेजर रफिक मुजावर यांचा मान्यवर व ग्रामस्थ्यांच्या वतीने फेटा शाल व पुष्पहार घालून "भव्य नागरी सत्कार "करण्यात आला. तालुका उपाध्यक्ष पदी फेर निवड केलेले मेजर भालचंद्र कोळी यांचा ही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

तुळजापूर तालुक्यातील सैनिक फेडरेशनच्या नुतन पदाधिकारी यांना निवडपत्र ही देण्यात आले.सैनिक फेडरेशनचे मागील वर्षभरात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पदाधिकारी यांना ही पुरस्कार देऊन प्रोत्साहित करण्यात आले. त्यानंतर मेजर अशोक गाडेकर, बाळासाहेब जावळे व सैनिक फेडरेशनचे निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त करताना सैनिक फेडरेशनच्या संघटनेविषयी सविस्तर माहिती सांगितली. अध्यक्षीय समारोप करताना ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी माजी सैनिकांच्या न्याय हक्कासाठी ही संघटना कार्यरत असून भविष्यात संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे ही सांगितले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार दिनेश सलगरे यांनी केले तर आभार उपसरपंच फिरोज मुजावर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच साहेबराव क्षीरसागर, उपसरपंच फिरोज मुजावर, लियाकत खुदादे,शिकूर मुजावर, महादेव भाऊ सोनटक्के, अमोल पाटील, हुसेन मकानदार, युसूफ पठाण, नजीर शेख, बबलू मुजावर, अशपाक मुजावर, बाबूलाल मकानदार, गौसपाक मुजावर, यांनी परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments