पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा श्रीमंतयोगी .... निश्चयाचा महामेरू !
शिवरायांचा दाखला देत गोविंद देवगिरी महाराजाकडून मोदींची स्तुती|
उत्तरप्रदेश : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा श्रीमंतयोगी व निश्चयाचा महामेरू असल्याचे गौरवोद्गार श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज उर्फ किशोरजी व्यास यांनी व्यक्त केले. प्राणप्रतिष्ठानंतर उपस्थित त्यांना संबोधित करताना गिरी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामींचे स्मरण करत मोदींचे कौतुक केले. एखादे परिवर्तन घडवून आणण्यासाठी एखाद्या महापुरुषाला स्वतःचे जीवन अर्पण करावे लागते आज देशाला मोदींच्या रूपाने एक आदर्श व्यक्ती लाभल्याचे यावेळी गिरी म्हणाले.
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मोदींनी ठेवलेल्या विशेष उपवास संदर्भात बोलताना गोविंद देवगिरी महाराज यांनी त्यांची तुलना शिवाजी महाराजांसोबत केली. तप करणे ही भारताची परंपरा राहिलेली आहे आज मला एका राज्याची आठवण होत आहे ज्याच्यात हे सर्व गुण होते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. लोकांना कदाचित माहिती नसेल ते स्वतः मलिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी श्रीशिल्यम येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी तीन दिवसाचा उपवास केला. तीन दिवस शिव मंदिरात राहिले महाराजांनी त्यावेळी सांगितले की मला राज्य करायचे नाही मला संन्यास घेऊन भगवान शंकराची सेवा करायची आहे. पण त्यांच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांची समजूत घातली आणि राज्य करणे ही देवाची सेवा असल्याचे पटवून दिले असे गिरी महाराज म्हणाले. आज मला समर्थ रामदासाची आठवण येत आहे त्यांनी शिवाजी महाराजांचे वर्णन करताना म्हटली होती की निश्चयाचा महामेरू बहुत जनाशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारु श्रीमंत योगी ! आज आपल्याला असाच एक श्रीमंतयोगी प्राप्त झाला आहे असे वक्तव्य ही गिरी महाराज यांनी यावेळी केले. एखादे परिवर्तन घडवून आणण्यासाठी एखाद्या महापुरुषाला स्वतःचे जीवन अर्पण करावे लागते आज देशाला मोदीच्या रूपाने एक आदर्श व्यक्ती लाभली आहे आज राम मंदिरात फक्त एका मूर्तीची प्रतिष्ठापना झाली नाही तर देशाची अस्मिता स्वाभिमान आणि आत्मविश्वासाची पुन्हा प्रतिष्ठापना झाली आहे 500 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हे स्वप्न पूर्ण होत आहे अशी गिरी महाराज म्हणाले प्राणप्रतिष्ठेने पूर्वी मोदींनी स्वतःहून पत्ते व नियम जाणून घेण्याचा प्रयत्न केला मोदींना केवळ तीन दिवसाचा उपवास करण्यास सांगण्यात आली होती पण त्यांनी अकरा दिवसाचा उपवास केला देशातील परिस्थिती लक्षात घेता एखाद्या राष्ट्रीय नेत्यांनी इतका त्या करणे सोपी गोष्ट नाही त्यांनी दिव्य देशाचा प्रवास करावा असेही आम्ही सांगितले.
0 Comments