Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव: श्रीपतराव भोसलेमध्ये श्री. तानाजी हाजगुडे यांना निरोप

धाराशिव:  श्रीपतराव भोसलेमध्ये श्री. तानाजी हाजगुडे यांना निरोप


धाराशिव : श्रीपतराव भोसले माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, धाराशिव येथील कला व विज्ञान शाखेला मराठी विषयाचे अध्यापन केलेले तसेच अलीकडे पर्यवेक्षक पदावर काम पाहत आलेले श्री. तानाजी पांडुरंग हाजगुडे हे त्यांच्या ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थाध्यक्ष श्री. सुधीर अण्णा पाटील सर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. आदित्य पाटील सर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक श्री. संतोष कुलकर्णी सर, संस्थेचे ऑडिट पाहणारे श्री. बजाज (सी. ए.) साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. एस. देशमुख सर, उपप्राचार्य श्री. एस. के. घारगे सर, कला व वाणिज्य शाखेचे पर्यवेक्षक श्री. एन. आर. नन्नवरे सर, फोटॉन बॅचचे प्रमुख श्री. भगत सर, श्री. संदीप जगताप सर यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक श्री. मोमीन एन. के. सर, श्री. कापसे एस. के. सर, श्री. नन्नवरे एन. आर. सर, उपप्राचार्य श्री. एस. के. घारगे सर, प्राचार्य श्री. एस. एस. देशमुख सर, प्रशासकीय अधिकारी श्री. आदित्य पाटील सर, संस्थाध्यक्ष श्री. सुधीर अण्णा पाटील सर आदींनी मनोगते व्यक्त केली. श्री. सुधीर अण्णा पाटील सर यांनी 'आजच्या काळात शिक्षक हा प्रयोगशील असला पाहिजे तसेच त्याने नवनवीन गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत', असे विचार मांडत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. डी. व्ही. पुजारी सर तर आभार श्री. नन्नवरे सर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments