चिवरी येथील महालक्ष्मी यात्रेत लाखो भाविकांनी घेतलले दर्शन, धार्मिक कार्यक्रमाने यात्रेची सांगता
यानंतर सकाळी आंबट भाताची दुरडी वाजत गाजत पोतराज ,आराधी, जान्या मुरळ्या यांच्यासह बनसोडे यांच्या घरी पोहोच करण्यात आली. मंगळवारी दिवसभरात मानकरी वाणी पाटील ,मराठा पाटील यांच्या वाड्यावर जाणे घोंगड्यात भात झेलणे यासह मानपानाची विधी पार पडले यानंतर रात्री दहा वाजता होमामध्ये धार्मिक विधी पार पडल्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला, रात्री बारा वाजता आताषबाजी हलगीच्या वाद्यांसह महालक्ष्मीची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. बुधवारी दि,२८ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता पान आणि लिंबू यांचा घाव घेण्याचा कार्यक्रम झाला, यानंतर पालखी मानाच्या पुजाऱ्याच्या घरी प्रस्थान करण्यात आली. यात्रेनिमित्त मंदिरापासून ते स्नानगृहापर्यत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
महालक्ष्मीच्या यात्रेला ' कायरं याञा ' या नावानेही ओळखले जाते. तसेच यंदाही महालक्ष्मी रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे भाविकांना वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला . तसेच यात्रेमध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी नळदुर्ग पोलीस ठाण्याचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
0 Comments