Hot Posts

6/recent/ticker-posts

आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नींना 25 गायींचे वाटप पर्याय संस्था व टाटा ए.आय.जी चा संयुक्त उपक्रम

आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नींना 25 गायींचे वाटप

पर्याय संस्था व टाटा ए.आय.जी चा संयुक्त उपक्रम


धाराशिव: पर्याय संस्था व टाटा ए.आय.जी च्या वतीने धाराशिव जिल्हयामधील भुम व वाशी तालुक्यातील 25 आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नींना गायींचे वितरण कार्यक्रम पर्याय संस्था सभागृह हासेगांव के कळंब येथे आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमा करीता पर्याय संस्थेचे सचिव मा.विश्वनाथअण्णा तोडकर, टाटा टाटा ए.आय.जी समुहांचे मा.देवांग पांडया, विलास माळी, नॅशनल हेड राजागोपाळ रूद्राराजु, मकरंद महेशपाठक, मिलींद आंब्रे, दिपक गावंडे, दादासाहेब ठोंबरे, बायफ संस्थचे अरूण बिडे, राहुल गोरे तसेच पर्याय संस्थेचे मा.सुभाषजी तगारे, विलास गोडगे, प्रकल्प समन्वयक तेजश्री भालेराव, सुनंदा खराटे, लेखाव्यवस्थापक उमेश टोणपे, डॉ. धनराज पवार आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलनाने झाली, त्यानंतर मा.विश्वनाथअण्णा तोडकर यांनी हया कार्यक्रमामागची संस्थेची भुमिका सविस्तरपणे मांडली, तसेच टाटा ए.आय.जी प्रतिनिधीनीं देखील टाटा ए.आय.जी सी.एस.आर समुह करत असलेली ​विविध समाजउपयोगी कामांची माहिती दिली. त्यानंतर महिलांना गायवितरणपत्र वाटप करण्यात आले. 

लाभार्थी महिलांच्या वतीने काही महिलांनी आपले अनुभव कथन देखील केले, व हा गाय वितरण कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला. आभार मा.विलास गोडगे यांनी व्यक्त केले. 

कार्यक्रम यशस्वीतेकरीता विकास कुदळे, रियाझ शेख, बालाजी शेंडगे, विनायक अंकुश, वैभव चौंदे, व भिकाजी जाधव हया सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.





Post a Comment

0 Comments