तुळजापूर तालुक्यातील युवकाची मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यतेतुन गळफास घेऊन आत्महत्या
तुळजापूर तालुक्यातील देवशिंगा येथील 27 वर्षे युवकांनी स्वतःच्या शेतातील झाडास मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार दिनांक एक मार्च रोजी सकाळी आठ वाजता उघडकीस आली. योगेश संजय जाधव हा जाधव दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता. त्यांना अवघी तीन एकर शेती आहे सततची नापिकी व दुष्काळी परिस्थितीमुळे घराचा उदरनिर्वाह चालावा याकरता योगेश गावातच छोटीशी चहाची टपरी चालवत होता. तो सातत्याने मराठा आरक्षण आंदोलनात अग्रभागी होता परंतु सध्याच्या घडामोडी व निर्माण झालेली परिस्थिती पाहता मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही या नैराश्यात होता यातूनच योगेशनी मराठा आरक्षणासाठी माझा जीव देत आहे एक मराठा लाख मराठा असा मजकूर कागदावर लिहून ठेवत शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली अशी माहिती कुटुंबाकडून मिळाली आहे योगेश याच्या पश्चात पत्नी एक मुलगा आई वडील बहीण असा परिवार आहे या आत्महत्येच्या घटनेमुळे तुळजापूर तालुक्यात हळूहळू व्यक्त होत आहे.बालाघाट न्युज टाइम्स तुळजापुर धाराशिव
0 Comments