व्याजासह रक्कम देण्याची बँक ऑफ महाराष्ट्रला ग्राहक मंचचे आदेश कर्ज खाती निरंक होऊनही ५७ हजाराची वसुली
धाराशिव : कर्जदार खातेदारांनी बँकेकडील कर्ज मुद्दल व व्याजासह परत करून बेबाकी प्रमाणपत्र घेतले तरी त्या कर्जाच्या खात्यावरून परस्पर 57 हजाराची रक्कम कर्ज खात्यात वर्ग करणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्र च्या कळंब शाखेला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दणका दिला आहे. सदरील रक्कम व्याजासह परत करून त्रासापोटी व तक्रारदार अर्जाच्या खर्चापोटी अशी एकूण दहा हजार रुपयाची रक्कम तक्रारदारास देण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिले आहेत.
याबाबत तक्रारदाराची वडील एडवोकेट प्रशांत खंडाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार कळंब येथील गोविंद दत्तोपंत बिराजदार यांनी बँक ऑफ महाराष्ट्र च्या कळंब शाखेतून एकूण आठ लाख रुपयांची कर्ज काढून वाहन खरेदी केली होती. तसेच सदरील कर्जाची नियमितपणे परतफेड ही सुरू होती दरम्यान बँकेने 2018-19 मध्ये महाबँक घरघर दस्तक योजना सुरू केली. यामध्ये बिराजदार यांनी अर्ज केला व बँकेकडून तो मंजुरी करण्यात आला त्यानुसार दिलेल्या मुद्देत बिराजदार यांनी बँकेला आवश्यक ती रक्कम भरून या योजनेचा लाभ घेत कर्ज खाते निरंक केले. त्यानुसार बँकेने त्यांना बेबाकी प्रमाणपत्र देऊन वाहनावरील बोजा कमी करण्याचे पत्रही दिले त्यानुसार भोजही कमी करण्यात आला अशी असताना बँकेने दिनांक 30 सप्टेंबर 2019 रोजी 45 हजार रुपये व दिनांक 7 फेब्रुवारी 2020 रोजी बेचाळीस हजार रुपये असे एकूण 87 हजार रुपये बिराजदार यांच्या बँक खात्यातून त्यांच्या परस्पर कर्ज खात्यात जमा ् घेतले. या विरोधात बिराजदार यांनी एडवोकेट खंडाळकर यांच्या माध्यमातून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचकडे दाद मागितली यावेळी समोर आलेला पुरावा व बिराजदार यांच्या वतीने एडवोकेट खंडाळकर यांनी मांडलेली भक्कम बाजू विचारात घेत ग्राहक मंचने सदरील रक्कम दिनांक 19 ऑक्टोबर 2020 ते तक्रारदार यांच्या हातात पडेपर्यंत दसादशे आठ टक्के दराने देण्याची आदेश दिले त्याचबरोबर शारीरिक व मानसिक त्रासापोटी 5000 व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी 5000 रुपये ही बँक तक्रारदारास द्यावेत असे आदेश दिले आहेत.
0 Comments