Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे जिल्हा परिषद शाळेचा बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा

तुळजापूर तालुक्यातील  चिवरी येथे जिल्हा परिषद शाळेचा बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा



चिवरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी  येथील जिल्हा परिषद प्राथमिक  शाळेचा बाल-आनंद मेळावा दि,१६ मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या बाल-आनंद मेळाव्याचे उद्घाटन महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले . अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शत्रुघ्न  बिराजदार हे होते. मान्यवरांच्या हस्ते बाल-आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचा योग्य दिशेने विकास व्हावा याकरिता शाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.त्याचाच भाग म्हणून गावामध्ये बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या बाल आनंद मेळाव्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरून चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते, स्टॉलची मांडणी विविध पदार्थाची विक्री, खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा मनमुराद आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. या आनंद मेळाव्यास चिमुकल्या पासून ते अबाल वृद्धांनी हजेरी लावली होती. विद्यार्थ्यांनी आणलेल्या सर्व खाद्यपदार्थाची गावकऱ्यांनी अतिशय उत्साहात विक्री झाल्याने चिमुकल्याच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. या बाल आनंद मेळाव्याप्रसंगी सरपंच शिवकन्या बिराजदार, शालेय समिती अध्यक्ष शत्रुघ्न  बिराजदार, विकास कार्यकारी सोसायटी चेअरमन बालाजी शिंदे, पोलीस पाटील रुपेश बिराजदार,किसन शिंदे, भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असलेले सोपान शिंदे, प्रशांत बिराजदार अंगणवाडी सेविका लक्ष्मी मेंढापुरे, कल्पना शिंदे, ग्रामपंचायत लिपिक अनिल देडे मुख्याध्यापक राहुल  मसलेकर,सहशिक्षक अण्णासाहेब भोंग, मोहन राजगुरू , सोनटक्के सर ,इंदिरानगर वस्ती शाळेतील विद्यार्थी सहशिक्षक आदींसह ग्रामस्थ पालक विद्यार्थी शिक्षण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









Post a Comment

0 Comments