Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव :श्रीपतराव भोसले ज्यु. कॉलेजमध्ये 'परीक्षा काळातील ताणतणावाचे व्यवस्थापन' याविषयावर व्याख्यान

धाराशिव :श्रीपतराव भोसले ज्यु. कॉलेजमध्ये 'परीक्षा काळातील ताणतणावाचे व्यवस्थापन' याविषयावर व्याख्यान


धाराशिव : जेईई, नीट व सीईटी या प्रवेश परीक्षांमधून विविध कोर्सेस साठी होणारी स्पर्धा जीवघेणी आहे, या परीक्षा जीवनाला नवीन वळण देतात हे खरे परंतु अशा परीक्षांना सामोरे जाताना खुप निराशा येते हेही तेवढेच खरे. या प्रवेश परीक्षांना सामोरे जात असताना विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या ताणतणावाला सामोरे जावे लागते, म्हणून येथील श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजमध्ये दिनांक २० एप्रिल रोजी विज्ञान शाखेतील खास जेईई, नीट व सीईटी ची पूर्व तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शहरातील नामवंत मनोविकार तज्ञ डॉ. श्री. महेश कानडे सर व मानसशास्त्र तज्ञ श्री. ख्वाजा अत्तार सर यांचे 'परीक्षा काळातील ताणतणावाचे व्यवस्थापन' या विषयावर महत्त्वपूर्ण व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमात डॉ. महेश कानडे यांनी परीक्षा काळात ताणतणाव न घेता या परीक्षांना हसत हसत सामोरे जावे. परीक्षा काळात आनंदी राहून पेपर सोडवल्यास सर्व काही व्यवस्थित आठवते, केलेल्या अभ्यासाचे चिंतन करावे, चिंता करू नये. तसेच डॉ. ख्वाजा अत्तार सर यांनी प्रश्नपत्रिका सोडवताना मानसिक दृष्ट्या सक्षम राहण्याचा सल्ला दिला. यावेळी संस्थाध्यक्ष श्री. सुधीर अण्णा पाटील सर यांनी त्यांच्या प्रास्ताविकाच्या भाषणात 'कुठलीही परीक्षा जीवनातील अंतिम परीक्षा नसते, तसेच कुठल्याही परीक्षेतील गुण अंतिम नसल्याचे' सांगितले. अशा परीक्षांमध्ये कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना समुपदेशन करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. तसेच आपले ध्येय केवळ एमबीबीएस, इंजीनियरिंगपुरते मर्यादित न ठेवता इतरही क्षेत्रातील संधींचा विचार करावा असाही सल्ला त्यांनी दिला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेजचे उपप्राचार्य श्री. एस. के. घारगे सर यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात पुढील महिन्यात होणाऱ्या नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष श्री. सुधीर अण्णा पाटील सर, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री आदित्य भैय्या पाटील सर, फोटॉन बॅचचे प्रमुख प्रा. श्री. ए. व्ही. भगत सर, फेनोमेनाल बॅचचे प्रमुख प्रा. श्री. पाटील जे. एस. सर, विज्ञान विभागाचे पर्यवेक्षक प्रा. श्री. शिंदे एम. व्ही. सर यांची खास उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमासाठी विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक-प्राध्यापिका उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी कॉलेजचे प्राचार्य श्री. एस. एस. देशमुख सर यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. श्री. डी. व्ही. पुजारी सर यांनी केले.

Post a Comment

0 Comments