तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने रॅलीद्वारे मतदार जनजागृती अभियान
चिवरी (बातमीदार) : भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १०० टक्के मतदान होण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठीच शाळांमधून पथनाट्य; प्रभातफेरीद्वारे जनजागृती करावी; तसेच प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकांनी प्रभातफेरी काढून मतदारामध्ये जनजागृती करावी, असे आदेश आहेत. त्याच पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील शिवरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मतदार जनजागृती करण्याच्या हेतूने शाळेतील मुलांची प्रभातफेरी काढून ''मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो'' अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच मतदार शपथ घेण्यात आली. ग्रामीण भागांत अशिक्षित मतदारांचे प्रमाण जास्त असल्याने घरोघरी जनजागृती केली जात आहे. या वेळीमुख्याध्यापक राहुल मसलेकर,सहशिक्षक अण्णासाहेब भोंग, मोहन राजगुरू , सहशिक्षक सोनटक्के, आदीसह ग्रामस्थ,तरूण विद्यार्थी उपस्थित होत.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क राजगुरू साखरे :मो.9881298946
0 Comments