सोलापूर : खून का बदला खून; पत्रा तालमीतील आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप
सोलापूर : खुन का बदला खुन, या हिंदी चित्रपटातील म्हणी प्रमाणे सत्यवान उर्फ आबा कांबळे (रा. उत्तर कसबा, सोलापूर) याचा खून केल्याप्रकरणी, अटकेत असलेल्या सात जणांना जिल्हा न्यायाधिश-३ एस.आर. शिंदे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
सुरेश उर्फ गामा अभिमन्यू शिंदे (वय ७४ रा. दक्षिण कसबा, पाणीवेस), रविराज दत्तात्रय शिंदे (वय ३२ रा. शाहीर वस्ती), अभिजीत उर्फ गणेश चंद्रशेखर शिंदे (वय ३२ रा. निराळे वस्ती), प्रशांत उर्फ अप्पा पांडुरंग शिंदे (वय ३६ रा. दक्षिण कसबा, पाणीवेस), निलेश प्रकाश महामुनी (वय ४१ रा. शेळगी), तौसिफ गुड्डूलाल विजापूरे (वय ३३ दक्षिण कसबा, पाणीवेस), विनीत उर्फ ईश्वर भालचंद्र खाणुरे (वय ३१ रा. दक्षिण कसबा, पाणीवेस) असे जन्मठेप झालेल्या आरोपींची नावे आहेत.
या घटनेची थोडक्यात हकीगत अशी ही ,गामा पैलवान हे पाणीवेस तालमीचे असून मृत आबा कांबळे हा तालमीचा होता. या दोन्ही तालमीतील भांडणातून सन 2004 मध्ये गामा पैलवान यांच्या मुलगा ऋतुराज शिंदे यांचा खून करण्यात आला होता. त्याचा बदला घेण्यासाठी सत्यवान उर्फ आबा कांबळे वय 36 यांचा 7 जुलै 2018 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नवी पेटीतील डाळिंबी आडलगत मोबाईल गल्लीत वरील आरोपींनी कोयत्यांनी सपासप वार करून खून केला होता. याप्रकरणी मृत आबा कांबळे यांचा भाचा शुभम धुळगाव याने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात वरील आरोपी विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये वरील आरोपींना दोषी धरून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश संगीता शिंदे यांनी जन्मठेप आणि प्रत्येकी 17 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
पत्रा तालीम आणि पाणीवेस तालमीत 2004 मध्ये शिवजयंती मिरवणुकीत धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून भांडण झाले होते त्यातूनच पाणीवेस तालमीतील सुरेश उर्फ गामा पैलवान यांचा मुलगा ऋतुराज याचा खून झाला होता त्या खटल्यात पत्रा तालमीच्या सत्यवान उर्फ आबा कांबळे यांच्यासह दहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती परंतु 2014 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात अपीलामध्ये सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली होती.
त्यामुळे गामा पैलवान व त्याचे साथीदार चिडले होते मृत आबा कांबळे हा डाळिंबी आडजवळ मोबाईल गल्लीत मोबाईल विक्री आणि दुरुस्तीचा व्यवसाय करीत होता सात जुलै 2018 रोजी तुरळक पाऊस पडत असताना आबा कांबळे हा दुकानाजवळ आडोशाला थांबला असताना दुचाकी गाड्या उडवत आलेल्या आरोपींनी आबा कांबळे यांच्यावर कोयत्याने हल्ला केला तेव्हा जीव वाचवण्यासाठी तो पळत असताना पाठलाग करून त्याच्यावर सपासप 56 वार करण्यात आले.
ही सर्व थरारक घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली होत मृत आबा कांबळे यांचे रक्ताने माखलेले कपडे गुन्ह्यात वापरलेल्या कोयत्यावरील रक्ताचे डाग तपासले असता ते मिळते जुळते निघाले. सीसीटीव्ही फुटीचा अस्सलपणा पुढे आला या खटल्यात 28 साक्षीदार तपासले गेले तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय जगताप तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर दिपाली काळे फिर्यादी शुभम धूळराव तसेच वैद्यकीय आणि रासायनिक प्रथकारणाशी करण्याची संबंधित तज्ञ अधिकाऱ्यांची साक्ष महत्वाची ठरली सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत तर आरोपीतर्फे ऍडव्होकेट श्रीकांत जाधव एडवोकेट शशी कुलकर्णी एडवोकेट प्रशांत नवगिरे एडवोकेट झुरळे यांनी काम पाहिले.
तपासी अंमलदारांची साक्षी ठरली महत्त्वाची
या प्रकरणात तपास फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक संजय जगताप यांनी केला होता या खटल्याच्या सुनावणी दरम्यान त्यांची सात दिवस उलट तपासणी घेण्यात आली त्यांनी दिलेली साक्ष आणि गोळा केलेली सुसंगत पुरावे आरोपींना जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यास महत्त्वाचे ठरले
सोलापुरात माजली होती खळबळ
सन 2004 जेव्हा ऋतुराज शिंदे यांचा खून झाला होता त्यावेळी सोलापुरात प्रचंड खळबळ माजली होती त्यावेळीच ऋतुराच्या कुणाचा बदला घेण्याची भावना भडकली होती पुढे आरोपींना जन्मठेप लागली मात्र मुंबई उच्च न्यायालयातून निर्दोष सुटून आल्यानंतर ऋतुराज चे वडील आणि गामा पैलवान यांनी 2018 मध्ये ऋतुरतचा मारेकरी असणाऱ्या आबा कांबळे यांचा खून केला त्यावेळी सुद्धा सोलापुरात प्रचंड खळबळ माजली होती.
0 Comments