धाराशिव : उन्हाळी सुट्टी, लग्नसराईच्या धामधूममुळे लालपरी हाऊसफुल
धाराशिव: सध्या सर्वत्र लग्नसराईची धूम सुरू असून व त्यातच विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी लागली आहेत त्यामुळे कोणी मामाच्या गावाला तर कोणी लग्न समारंभाला जात असल्याने प्रवास करण्यासाठी सर्वसामान्यांची असलेली लाल परिस्थिती बस हाउसफुल राहत आहे, उन्हाचा पारा वाढलेला असला तरी तुळजापूर सोलापूर संभाजीनगर पुणे मुंबई या मार्गावरील बसेस रोजच प्रवाशाच्या गर्दीने खचाखच भरून जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामध्ये तुळजापूर येथील तुळजाभवानी मातीचे तीर्थक्षेत्र असल्यामुळे तर येरमाळा येथे येडेश्वरी चे मंदिर असल्यामुळे भाविकांची धाराशिव तुळजापूर बस स्थानकामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तर ग्रामीण भागातील एसटी बसेसची संख्या कमी असल्यामुळे या मार्गावरील बसेसची संख्या वाढवावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे.
सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने एसटीमध्ये प्रवासी संख्या वाढली आहे त्यामुळे सर्वच मार्गावरील बसेस खचाखच भरून जात आहेत बसची संख्या कमी असल्याने व एसटीमध्ये ही प्रवाशांची संख्या वाढल्याने नाईलाजाने काही भागात प्रवाशांना खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे. तुळजापूर तालुक्यात सर्वत्र सध्या लग्नसराईचा धुमधडाका सुरू आहे मात्र वाढत्या तापमानामुळे वऱ्हाडी मंडळींना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
0 Comments