Hot Posts

6/recent/ticker-posts

दुर्दैवी घटना : बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यावर नियतीचा घाला, वीज कोसळून विद्यार्थी ठार

दुर्दैवी घटना : बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यावर काळाचा घाला, वीज कोसळून विद्यार्थी ठार



सोलापुर : करमाळा तालुक्यातील रावगाव येथे दि,२२ रोजी अंगावर वीज कोसळून एक विद्यार्थी ठार झाला आहे. संबंधित विद्यार्थ्यांची बारावी झाली असून त्याचा कालच (मंगळवारी) परीक्षेचा निकाल झाला होता. त्याला पुढे शिक्षण घ्यायचे होते.

मात्र त्यापूर्वीच त्याच्यावर काळाने घाला घातला आहे. या घटनेची माहिती समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. जयदीप बापू पवार (वय १७) असे संबंधित विद्यार्थ्यांचे नाव असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ठार झालेल्या तरुणाचा मृतदेह करमाळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला आहे.

Post a Comment

0 Comments