शासकीय कामात अडथळा प्रकरणी बापलेकास, सक्तमजुरीची शिक्षा
धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
धाराशिव : नाकाबंदी दरम्यान कर्तव्यावरील पोलीस हेड कॉनिस्टेबलची हुजत घालून त्यांना धक्काबुक्की करत धमकावल्याप्रकरणी बाप लेकास न्यायालयाने सक्त मजुरी व आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ही घटना दिनांक 4 ऑक्टोबर 2018 रोजी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी टोलनाका येथे घडली होती.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार घटनेची थोडक्यात हकीगत अशी की दिनांक 4 ऑक्टोंबर 2018 रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कडे कॉन्स्टेबल जयराम राठोड हे वरिष्ठ अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री चौरे यांच्यासह तामलवाडी टोलनाका येथे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत होते .यावेळी तुळजापूर वरून वाहन क्रमांक 13 ए एन 54 63 येत असताना कर्तव्यावरील राठोड यांनी त्याला हाताने इशारा करून वाहन थांबवण्यास सांगितले वाहन चालकाने सदरचे वाहन थांबवले असता सहाय्यक पोलीस निरीक्षक चौरे यांनी वाहनांचे कागदपत्रे दाखवण्यास सांगितले यावेळी चालक विठ्ठल बिराजदार यांनी माझा गाडी मालक आल्यानंतर कागदपत्रे बघायचे असे म्हणून चौरे यांच्याशी उद्धट बोलू लागला .यावेळी फिर्यादी राठोड यांनी त्यांना व्यवस्थित बोलण्यास सांगितले असता उलट चालक बिराजदार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक चौरे यांच्या अंगावर धावून जात तुम्हाला कागदपत्र बघायचा काय अधिकार आहे असे म्हणत शिवीगाळ करू लागला. याच वेळी सदरील वाहन चालक विठ्ठल बिराजदार यांचा मुलगा रेवणसिद्ध बिराजदार राहणार (सोलापुर) तेथे पिकप वाहन घेऊन दाखल झाला. त्याने माझ्या वडिलांना का धरलात म्हणत फिर्यादी राठोड व सहाय्यक पोलीस निरीक्षक चौरे यांच्या गच्चीला धरून तुम्हाला दाखवता असे धमकी देऊन शासकीय कामात अडथळा केला. याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात या बाप लेका विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश 1 आर एस गुप्ता यांच्या समोर सुनावणी झाली .यावेळी समोर आलेले पुरावे साक्ष व सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त शासकीय अभियोग्यता सचिन .एस. सूर्यवंशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायाधीश श्री गुप्ता यांनी आरोपी रेवणसिद्ध विठ्ठल बिराजदार (विद्यानगर शेळगी सोलापूर,) यांचा भारतीय दंड संहिता विधान चे कलम 353 नुसार एक वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रुपयांचा दंड तर आरोपी विठ्ठल भगवंत बिराजदार यांना दोन वेगवेगळ्या कलमाने 5000 रुपयाचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. सदर प्रकरणात अति जिल्हा शासकीय अभियोग्यता यांना पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रजीत नरसिंगे यांनी कोर्ट पैरवी म्हणून सहकार्य केले.
0 Comments