Hot Posts

6/recent/ticker-posts

डोहाळे जेवणाहून परतणाऱ्या सख्ख्या जावासह दुचाकी वरील तिघे टेंभुर्णी जवळ अपघातात ठार

डोहाळे जेवणाहून परतणाऱ्या सख्ख्या जावासह दुचाकी वरील तिघे टेंभुर्णी जवळ अपघातात ठार


सोलापूर : डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आटोपून येत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी वरील तिघांचा मृत्यू झाला ही घटना गुरुवारी रात्र सव्वा बाराच्या सुमारास सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर टेंभुर्णी येथील शिराळ पाटील नजीक हॉटेल जय मल्हार जवळ ही घटना घडली आहे .

याबाबत अधिक माहिती अशी की महादेव रमेश ताकमोगे वय (22) राहणार( डिस्कळ ता. मोहोळ) सध्या राहणारे (एमआयडीसी टेंभुर्णी तालुका माढा.) महानंदा विकास पवार वय 45 सुषमा प्रकाश पवार वय 40 दोघे राहणार (देगाव तालुका मोहोळ) अशी मृतांची नावे आहेत. त्यातील महानंदा व सुषमा पवार या सख्या जावा आहेत भीम नगर तालुका माढा येथील पाहुण्यांच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी ते आल्या होत्या कार्यक्रम झाल्यानंतर महानंदा पवार यांनी मावस भाऊ महादेव ताकमोगे यास बोलून घेतले गुरुवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास तिघेजण मोटरसायकल वरून एम एच 45 चे 81 झिरो सहा या या मोटरसायकल वरून टेंभुर्णी कडे निघाले शिराळ पाटील यांची हॉटेल जय मल्हार समोर अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची मोटरसायकल धडक दिली यात महादेव व सुषमा यांचा जागीच ठार झाले तर,  महानंदा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. टेंभुर्णी पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांचा शोध सुरू आहे.

एक दिवसापूर्वीच महादेवचा झाला होता साखरपुडा

मूळचा ताकमोगेवाडी तालुका माढा येथील महादेव ताकमोगे हा व्यवसायनिमित्त टेंभुर्णीत राहण्यास होता .टेंभुर्णी एमआयडीसीतील बारामती अग्रो समोर त्यांचे हॉटेल होते महादेव चा 22 मे रोजी लक्ष्मी टाकळी तालुका पंढरपूर येथील मुलीशी साखरपुडा झाला होता दुसऱ्या दिवशीच अपघातात त्याचा मृत्यू झाला महादेव यांच्या पश्चात आई-वडील बहीण असा परिवार आहे महादेवच्या अकाली निधनाने परिसरात हळूहळू व्यक्त केली जात आहे

Post a Comment

0 Comments