आनंदाची बातमी :गौरी गणपती उत्सवातही मिळणार आनंदाचा शिधा
मुंबई: यंदाच्या गौरी गणपती उत्सवा निमित्त राज्यातील 1 कोटी 70 लाख 82 हजार 86 शिधापत्रिकेधारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे .
प्रति संच १०० रुपये या सवलत्या दराने मिळणाऱ्या या आनंदाचा शिधा संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या जिन्नसाचा समावेश असणार आहे आनंदाचा शिधा संचाची वाटप 15 ऑगस्ट 2024 ते 15 सप्टेंबर 2024 या कालावधीत करण्यात येणार आहे. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्न व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील केसरी शिधापत्रिका धारक शेतकरी यांनाही आनंदाचा शिधा मिळणार आहे प्रति शिधापत्रिका एक शिधा जिन्नस संचाची खरेदी करण्यासाठी 562.51 कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे या संचाचे वाटप इ-पाॅस द्वारे करण्यात येणार आहे.
0 Comments