Hot Posts

6/recent/ticker-posts

सावत्र मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपी बापास १० वर्ष सक्तमजुरी ,धाराशिव न्यायालयाचा निकाल|Accused Bapas sentenced to 10 years of hard labor for abusing his stepdaughter, Dharashiv court verdict

सावत्र मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपी बापास १० वर्ष सक्तमजुरी ,धाराशिव न्यायालयाचा निकाल


धाराशिव  : सावत्र मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी वडीलास १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व ५१ हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा त्यापैकी ५० हजार रुपये पिडीत मुलीस देण्यात यावेत, अशा शिक्षेचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. जी. मोहीते यांनी सोमवारी (दि.२२) दिले आहेत. याप्रकरणी सरकार पक्षाच्यावतीने एकुण ८ साक्षीदारांच्या साक्ष नोंदविण्यात आले व बचाव पक्षाच्यावतीने ०१ साक्षीदार तपासण्यात आला. सरकारी पक्षाचा पुरावा व शासकिय अभियोक्ता महेंद्र बी. देशमुख यांनी केलेला युक्तीवाद ग्रा धरून ही शिक्षा ठोठावली आहे.

या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, १२ जानेवारी २०२२ रोजी पिडीतेने नळदुर्ग पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की, पिडीतेची आई हीचे पिडीतेचे सावत्र वडिल आरोपी याच्यासोबत १० वर्षापूर्वी लग्न झालेले असुन पिडीतेचे १० वी पर्यंतचे शिक्षण मुंबई येथे तिच्या आजीकडे झाले.

पिडीता ही ११ वी पासुन नळदुर्ग येथे शिक्षण घेण्यासाठी आली व तिची आई, लहान भाऊ व सावत्र वडिल आरोपी यांच्यासोबत राहु लागली. १० जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पिडीतेचे सावत्र वडिल आरोपी हे शेतात कामासाठी गेले होते व त्यानंतर ११.३० च्या सुमारा पिडीतेचे आई बाजार आणण्यकरीता गेले होती व भाउ बाहेर गेला होता व पिडीता घरामध्ये एकटीच बसलेली असताना पिडीतेचे सावत्र वडिल आरोपी हे हातात कु-हाड घेवुन आले व त्यांनी पिडीतेला अंगावरील सर्व कपडे काढण्यासाठी सांगितले.

त्यावेळी पिडीतेने कपडे कशाला काढायला सांगता असे म्हणाली असता तु कपडे काढ नाहीतर जिवे मारतो. अशी धमकी आरोपीने पिडीतेस दिली व आरोपीने पिडीतेचे अंगावरील कपडे काढले व पिडीतेसोबत तिचे इच्छाविरूध्द शारिरीक संबंध केले व सदर घटना कोणाला सांगितल्यास पिडीतेला व तिच्या आईला ठार मारून टाकण्याची धमकी आरोपीने दिली.

पिडीतेने तिच्या आईला आरोपीने केलेल्या अत्याचाराबाबत सांगितले असता पिडीतेच्या आईने तिस घेवुन पोलीस स्टेशन नळदुर्ग येथे गेली. त्यावरून सदर आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सदर खटल्याची सुनावणी धाराशिव येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. जी. मोहीते यांचे समोर घेण्यात आली. सरकार पक्षाच्यावतीने एकुण ८ साक्षीदारांच्या साक्ष नोंदविण्यात आले व बचाव पक्षाच्यावतीने १ साक्षीदार तपासण्यात आला. सरकारी पक्षाचा पुरावा व शासकिय अभियोक्ता महेंद्र बी. देशमुख यांनी केलेला युक्तीवाद ग्रा धरून पिडीतेचे सावत्र वडिल आरोपी याने पिडीतेवरती बलात्कार केल्याचे सिध्द झालेवरून आरोपीस न्यायालयाने १० वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा व ५१ हजार रुपये दंड त्यापैकी ५० हजार रुपये पिडीत मुलीस व दंड न भरल्यास २ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा अशी शिक्षा सोमवारी (दि.२२) ठोठावली आहे.


Post a Comment

0 Comments